सावदा (प्रतिनिधी ) – येथील समर्थ अकॅडमी अँड फाउंडेशन फॉर एक्सेलंस या संस्थेतर्फे आषाढी एकादशी चे औचित्य साधत व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समर्थ अकॅडमी चे प्रमुख संचालक श्री दिपकराज पाटील, तर प्रमुख मर्गदर्शक म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा डॉ दयाघन एस राणे हे उपस्थित होते.
आपल्या प्रमुख मार्गदर्शनात प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी व्यसनांचे विविध प्रकार सांगितले. तसेच महाराष्ट्रातील संतांनी अनेक शतकांपासून समाजातील व्यसनांच्या संदर्भात जनजागृती केलेली आहे त्याचे दाखले दिले. त्या सोबतच डॉ राणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल फोन च्या वाढत्या वापराकडे ही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. शालेय विद्यार्थ्यांचे मन संवेदनशील, संस्कारक्षम असण्याबरोबरच अनुकरणशील ही असते. म्हणून या वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये व्यसन संदर्भात जागृती करता येते. म्हणून विद्यार्थ्यांनी जाहिरातींकडे आकर्षित न होता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे संचालक श्री दिपकराज पाटील म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल फोन चे व्यसन वाढत असून त्याचे ही दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. अभ्यास करीत असताना त्यामधील संकपलनांबद्दल माहिती मिळवण्यासाठी म्हणून मोबाईल फोन चा वापर करणे ही ठीक आहे. परंतु त्याचा अतिरिक्त वापर थांबवला पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन संस्थेतील शिक्षक श्री उमेद लोखंडे यांनी केले. तर आभार श्री सौरभ पाटील सरांनी केले. कार्यक्रम प्रसंगी संस्थेतील सर्व वर्गांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.

फोटो ओळ —समर्थ अकॅडमी सावदा येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करीत असताना प्रा डॉ दयाघन राणे


