दररोज १५ मिनिटे स्वतःसाठी राखा” – विवेकानंद महाराज

शिर्डी प्रतिनिधी:
धकाधकीच्या जीवनात आपण इतरां साठी वेळ देतो, पण स्वतःसाठी वेळ देत नाही. आत्ममालिक ध्यान पीठाचे सचिव विवेकानंद महाराज यांनी ‘व्हाईस ऑफ मीडियाच्या’ कार्यशाळेत सांगितले की, दररोज कमीतकमी १५मिनिटे स्वतःसाठी द्या. असा लाख मोलाचा सल्ला आत्मा मालिक ध्यानपिठाचे सचिव आशिष महाराज यांनी दिला

विवेकानंद महाराज म्हणाले की ही वेळ आत्मचिंतन आणि, निरीक्षणासाठी व अंतर्दृष्टीसाठी उपयुक्त ठरत आहे, कारण निरीक्षणाशिवाय अंतर्मुख होता येत नाही. आपल्या भावना, कर्म, आणि संवेदनांची जाणीव या वेळेत करा. ही संवेदनशीलता जर पत्रकारितेत उतरली, तर माध्यमांचं कार्य अधिक अर्थपूर्ण होईल. असा संदेश त्यांनी दिला.

आत्मा मालिक ज्ञानपीठाचे विवेकानंद महाराज यांनीही ध्यानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, विनम्रतेचं आणि सेवा भावाचं उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांनी आयुष्यभर लोकजागृती केली, कोणतीही प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता. त्यांनी जगातला शेवटचा माणूसआहे’असं म्हणून सर्वांनाच श्रेष्ठ मानण्याचा आदर्श दिला. असल्याचे आशिष महाराज यांनी सांगितले