पत्रकारांनी ग्रामीण समस्यांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे – संदीप वाकचौरे


शिर्डी: प्रतिनिधी –

“ग्राम पत्रकारिता म्हणजे गावगाड्याचा दस्तऐवज असतो. तो जितका प्रगल्भ असेल, तितका तो प्रभावी ठरतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले.

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटने च्या वतीने आत्मा मालिक पावन भूमीत आयोजित ग्रामीण पत्रकारितेवरील दोन दिवसीय कार्यशाळेत ग्रामीण पत्रकारिता या विषयावर बोलताना वाकचौरे म्हणाले की मुंबईसारख्या महानगरांत बसलेले संपादक ग्रामीण वास्तवाकडे गंभीरतेने पाहत नाहीत. ग्रामीण बातम्यात ‘ग्रॅव्हिटी’ नसते असा गैरसमज आहे. पण वस्तु स्थिती अशी आहे की ती ‘दाखवली’ जात नाही,” असे त्यांनी सांगितले ग्रामीण भागा तील पत्रकारांनी केवळ घडामोडी नोंदव ण्यावर भर न देता सामाजिक संदर्भासह प्रश्न मांडावेत. जलसंधारण, अनुदान, पर्यावरणीय परिणाम, सार्वजनिकआरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था, बालमृत्यूचे प्रमाण, महिलांचे आरोग्य या विषयावर सखोल मार्गदर्शन करत ग्रामीण पत्रकारां समोर असणाऱ्या वास्तववादीजबाबदार्या अधोरेखित करताना शेती, आरोग्य, शिक्षण, कुपोषण, जलसंधारण अशा विषयांवरील संवेदनशील व अभ्यासपूर्ण वार्तांकनावर भर देण्याचे आवाहन करत सखोल विश्लेषणात्मक बातम्या करावे असे त्यांनी सांगितगावात एक महिला आरोग्य अधिकारीही नसणं, शाळा बंद होणं, शेतकऱ्यांचे देशी प्रयोग, शिक्षणा तले धोरणात्मक बदल हे सगळे प्रश्‍न पत्रकाराने समजून घेऊन हे विषय पत्रकारितेच्या माध्यमातून मांडले जावे असा मोलाचा संदेश वाकचौरे यांनी दिला . या कार्यशाळेमध्ये मुक्त गोठा प्रकल्प, पीक व्यवस्थापन, स्थानिक पातळीवरील न्यायालयीन लढे,तसेच बियाण्याची फसवणूक, वंचित घटकांचे शिक्षण, कुपोषणासारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला.

चौकट

बातमी शोधायची नसते – ती आसपास असते
“ग्राम पत्रकारांना बातमी शोधायची नसते, ती त्यांच्या अवतीभवती घडत असते. त्यांना पाहण्याची दृष्टी, समजून घेण्याची जबाबदारी आणि मांडण्याची जिद्द असावी लागते,” असे सांगत सर्व पत्रकारांनी स्थानिक प्रश्नांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान त्यांनी केले