ऑपरेशन सिंदूर” मधील शहीदांना भुसावळ येथे भावपूर्ण श्रद्धांजली –


भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा दलात बल (RPF) रेल्वे रिझर्व लाईन येथे, देशभक्तीने ओतप्रोत भरलेला एक भावनिक कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयंकर आतंकवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता या क्रूर कृत्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी एकत्रितपणे “ऑपरेशन सिंदूर” हे विशेष अभियान राबवले. या मोहिमेत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर अचूक आणि प्रभावी कारवाई करत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

या अभियानात भारताचे ८ शूर सैनिक वीरमरण पावले. त्यांच्या त्यागास आणि शौर्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी भुसावळ येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात दोन मिनिटांचे मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर श्रमदान व वृक्षारोपण उपक्रम राबवले गेले. प्रत्येक शहीदाच्या नावानंतर उपस्थितांनी “अमर रहे!” असा जयघोष करत त्यांना सलाम केला.

कार्यक्रमात विविध विभागातील रेल्वे सुरक्षा बलांचे अधिकारी आणि जवानांनी उपस्थिती लावली. त्यांची तपशीलवार यादी पुढीलप्रमाणे आहे यावेळी जवळपास ७३ सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते

हा कार्यक्रम फक्त श्रद्धांजलीवर नव्हता, तर तो एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम देखील ठरला. शहीदांचा त्याग विसरणे अशक्य आहे, आणि त्यांच्या स्मरणाने प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक बळकट झाली.