भुसावळ रेल्वे स्थानकावर “ऑपरेशन अमानत” अंतर्गत प्रवाशाचा बॅग परत ;


भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे भुसावळ रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत , बडनेरा स्थानकावर ऑपरेशन नन्हे फरीष्ते , मलकापूर रेल्वे स्थानकावर ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी अंतर्गत भउपक्रम राबविण्यात आले . यामध्ये भुसावळ विभागातील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, दक्षता आणि मानवतावादी दृष्टीकोनामुळे प्रवाशांचे विश्वासार्ह रक्षण आणि सेवा सुनिश्चित करण्यात आली आहे. या तिन्ही घटनांमुळे आरपीएफ समाजात सकारात्मक प्रतिमान निर्माण झाले आहे.

या उपक्रमात

“भुसावळ येथे ऑपरेशन अमानत” अंतर्गत मनीष परदेसी नावाच्या प्रवाशाचा हरवलेला काळ्या रंगाचा सॅग बॅग रेल्वे सुरक्षा बल (RPF) च्या सतर्कतेमुळे सुखरूप परत मिळाला. सदर बॅग 12628 ट्रेनच्या S/6 कोचमधील सीट नं. 7 वर सापडली होती. ऑन ड्युटी CT राजेश कुमार यांनी बॅग मिळवून RPF पोस्ट भुसावळ येथे जमा केली. उपनिरीक्षक दीपक तायडे यांनी ती मनीष परदेसी यांना अधिकृतपणे सुपूर्त केली. प्रवाशाने RPF च्या कार्याचे कौतुक करत आभार मानले

बडनेरा स्थानक : “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत दोन नाबालिग मुलींचे रक्षणबडनेरा रेल्वे स्थानकावर 22846 ट्रेनमधून दोन नाबालिग मुली – चंचल (४ वर्ष) आणि जिया (८ वर्ष) – या SI श्रद्धा घरडे व त्यांच्या टीमला S/7 कोचमध्ये पालकांशिवाय मिळाल्या. त्यांना तत्काळ चाइल्ड लाइन कार्यकर्ता रमेश मोंढे यांच्या स्वाधीन करण्यात आले.

चौकशीनंतर त्यांचा मामा महेंद्र कुयटे यांची ओळख पटल्यावर पंचनामा करून मुलींना त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आले. CWC अमरावती यांच्याकडून दूरध्वनीवरून अधिकृत आदेश घेण्यात आला होता. नातेवाइकांनी RPF च्या संवेदनशीलतेबद्दल आभार मानले.

मलकापूर स्थानक : “ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी” अंतर्गत मोबाईल चोर गजाआडमलकापूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर RPF च्या गस्तीदरम्यान एक संशयित तरुण पकडण्यात आला. त्याच्याकडे POCO कंपनीचा ग्रे रंगाचा मोबाईल आढळून आला. कसून चौकशीअंती त्याने भुसावळ ते खंडवा दरम्यान ट्रेन नं. 01668 च्या S/4 कोचमधून मोबाईल चोरीची कबुली दिली. मोबाइलचा मूळ मालक सुजीत याने संपर्क करून तक्रार नोंदवली होती. आरोपी शेख सोहेब शेख सलीम (वय २२, मलकापूर) याला पुढील कार्यवाहीसाठी GRP शेगाव येथे सुपूर्द करण्यात आले.

भुसावळ विभागातील RPF कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, दक्षता आणि मानवतावादी दृष्टीकोनामुळे प्रवाशांचे विश्वासार्ह रक्षण आणि सेवा सुनिश्चित करण्यात आली आहे. या तिन्ही घटनांमुळे RPF चे समाजात सकारात्मक प्रतिमान निर्माण झाले आहे.