भुसावळ –
राज्यात गोमातेला राज्यमाता सन्मान मिळाला तरी गोहत्या सुरुच आहे अश्यावेळी प्रत्येक गोमाता व गोवंशाला टॅगींग अनिवार्य केल्यास कत्तलीला जाणाऱ्या गोवंशाची अवैध वाहतुक रोखण्यास वा गोमाता ओळख पटविण्यासाठी निश्चित मदत होईल अशी मागणी गोरक्षक रोहित महाले यांनी केली असुन याबाबतीत पशुसंवर्धन आयुक्त डॉ प्रवीण देवरे यांना निवेदन दिले .

पोलीस विभागाच्यावतीने जेव्हा वाहतुकीतील गोवंश गोमातता पकडली असता त्या गोवंश गोमातेला ओळखणे कठीण असते जर टॅगिंग केलेले असेल तर त्यांची टॅगीग नंबरने ओळख पटविण्यास मदत होते यामुळे चोरीला आळा बसत मुळ मालकाचाही शोध लागतो जेणेकरून गोहत्या बंदीवर आळा बसेल तसेच पाळीव गोवंशा प्रमाणे भटक्या गाई गोमाता व गोवंशालाही टॅगींग व्हावी असेही निवेदनात नमूद केले आहे . पशुसंवर्धन आयुक्त डॉ प्रवीण देवरे यांना गोसेवक
रोहित महालेनी निवेदन दिले .
महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सबिलिटी यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय गो आधारीत शेती प्रशिक्षण चिंतन व महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण नियोजन बैठक या कार्यक्रमात राज्यातुन गोसेवा करणारे गोसेवकांना बोलविले होते .यावेळी रासायनिक शेती न करता गो आधारीत शेती केल्यास असंख्य आजार होत नाही जमीन देखील सुपीक होत गोमाता गोवंशाचे रक्षण होते आदी विषयावर चिंतन झाले


