भुसावळ – मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि मागणीनुसार देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ सुरू केली आहे. गाडी क्रमांक 01153 देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेला 14 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. प्रत्येक शनिवारी देवळाली येथून आपल्या नियोजित वेळेत ही गाडी सुटणार आहे
गाडी क्रमांक 01154 दानापूर ते मनमाड शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे 16 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत प्रत्येक सोमवारी दानापूर येथून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज, आरा, बक्सर आणि दानापूर या मार्गांवर धावणार आहे. शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेत एकूण 10 वीपी (प्रत्येक 23 टन क्षमता असलेल्या) डब्यांसह 10 सामान्य डबे जोडण्यात आले आहेत. या रेल्वेच्या माध्यमातून शेतकर्यांकडील डाळिंब, सीताफल, द्राक्षे, कांदे, संत्रे, लिंबू, बर्फ मच्छी इत्यादींना सुरक्षित आणि वेगाने बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे शक्य होत आहे. ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ या रेल्वेचा उद्देश शेतकर्यांच्या उत्पादनांना वेळेत बाजारांपर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिक फायदे देणे आहे.

प्रवासी वाहतुकीतून 12.50 लाखांचा महूसल प्राप्त
7 डिसेंबर या गाडीतून 1500 टन मालाची वाहतूक झाली असून भुसावळ मंडळाला या गाडीतून 55 लाख 70 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तसेच या गाडीतून एकूण 5600 प्रवाशांनी प्रवास केल्याने एकूण 12 लाख 56 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.


