जळगाव – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 7 वाजता महानिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न, महामानव, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रेल्वे स्टेशन जळगाव येथे आदरांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्पष्ट केले व आचरणात आणण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे सांगितले तर नूतन तासखेडकर यांनी संविधान व घटनेचे महत्त्व सांगितले . आशा मौर्य यांनी त्यांचें गुणवर्णन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किमया पाटील यांनी केलें कार्यक्रमास श्रीमती ज्योती राणे यांचे मार्गदर्शन लाभले.आभार वंदना मंडावरे यांनी मानले.
या प्रसंगी सौ मनीषा पाटील, नूतन तासखेडकर, आशा मौर्य, वंदना मंडावरे, किमया पाटील, हर्षा गुजराती, अस्मिता सोनवणे, नीता विसावे, या पदाधिकारी उपस्थित होत्या.


