भुसावळ – गणपती उत्सवानिमित्त गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळात होणाऱ्या विविध मनोरंजनात्मक खर्चिक बाबीना फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने नागरीकांना मतदान कार्ड,आयुष्यमान कार्ड व ई श्रम कार्ड मोफत बनवून देन्यात आले

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्रीमती नीता लबडे , तलाठी पवन पवन नवगाळे, पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे( , राजस्थानी विप्र समाज अध्यक्ष डॉ उकमलकांत शास्त्री माहेश्वरी समाउ राधेश्याम लाहोटी अग्रवाल समाज अध्यक्ष योगेश अग्रवाल शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ माज़ी उपनगर अध्यक्ष हाजी नईम पहलवान आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार श्रींमती नीता लबडे यांचे हस्ते करण्यात आले मंडळाच्या जनसेवेसाठी व जनहितार्थ समर्पित” ध्येयधोरणानुसार ” विघ्नहर्ता गणेश मंडळाच्यावतीने नेहमी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात यात अन्नदान,थंडी मध्ये गोर ग़रीबाना कांबळ वाटप , ,दिवालीत फ़राळ वाटप , ,ग़रीब विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य व शालेंय गणवेश , ,स्कूल बॅग वाटप करन्यात येते विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणऱ्या व्यक्तिचा सन्मान करून त्याचा गौरव करण्यात येतो या अनुषंगाने भुसावळ विभागात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांना शासनाच्या वतीने उत्कृष्ट कार्या बद्दल गोरविन्यात आले .

उत्कृष्ट तहसीलदार म्हणून विद्धहर्ता गणेश मंडळाच्यावतीने उमाकांत शर्मा (नमा ) यांचे हस्ते तहसीलदार नीता लबडे याचा नागरी गौरव करून शाल श्रींफळ व सम्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच उत्कृष्ट तलाठी पवन नवगाळे याचाही शाल श्रींफल पुष्पगुच्छ व सम्मानचिन्ह देंऊन सन्माम करण्यात आला तर गरजू गोर गरीब व रुग्णसेवेसाठी त्वरित रेशनकार्ड बनवून देणारे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला .-
दरम्यान गणेश उत्सवा निमित्त शुक्रवार रोजी शिबीर घेण्यात आले या शिविरा मध्ये 245 नागरिकांनी लाभ घेतला यात नागरिकांना मोफत मतदानकार्ड , ई -श्रम कार्ड व आयुष्यमान कार्ड बनवून देण्यात आले . प्रसंगी गणेश मंडळातर्फे यापुढे सुद्धा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचवून जनतेला त्याचा लाभ मिळेल असे कार्य घेण्यात येतील अशी माहिती आयोजक समाजसेवक उमाकांत शर्मा (नमा) यानी यावेळी दिली . कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश मंडळ पदाधिकारी , कार्यकर्ते व गणेशभक्त यांनी परिश्रम घेतले



