अमळनेर :अमळनेरच्या पत्रकार रजनीकांत पाटील यांनी प्रसंगावधान दाखवून मोठ्या धाडसाने रेल्वेखाली आलेल्या प्रवाश्याचे प्राण वाचल्याने पत्रकार पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

शहरातील रेल्वे स्थानकावर दि. ८ रोजी दुपारी ३:४० वाजेच्या सुमारास सुरतच्या दिशेने जाणारी गांधी धाम एक्सप्रेस अमळनेर प्लॅटफॉर्म क्र. १ वर येत असताना सुरत ला जाण्यासाठी निघालेला प्रवाशी विकास अभिमन्यू पाटील राहणार – झाडी हे जागा मिळवण्यासाठी धावपळ करत प्लॅटफॉर्म वरून गाडीत चढत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते गाडीच्या चाकाखाली आले. यावेळी प्लॅटफॉर्मवर पत्रकार रजनीकांत पाटील हे उभे होते त्यांनी जिवाची पर्वा न करता अत्यंत धाडसाने धाडसाने त्या तरुणाचा हात धरून त्याला वर खेचले यावेळी चाकाखाली आल्याने त्यांच्या दोन्ही पायाच्या पंजाचा चंदामेंदा झालयाचे दिसून आले दरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने उचलून त्यांना पलटावर ठेवले व तातडीने आर पी एफ व जीआरपीएफ यांना संपर्क साधला असता घटनास्थळी पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचारी यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले व तेथून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास लोहमार्ग पो.ना दिनकर कोळी करीत आहे.


