संवेदनशील जिल्हाधिकारी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार :

भुसावळ – ,प्राण्यांवर प्रेम करा त्याचेवर दया करा त्यांची देखभाल करा ,आदी मर्मिक सूचना वजा आदेश आपण ऐकतो व ते पाळतो मात्र जिल्ह्याचे
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज चक्क एका जखमी गाढवावर त्वरित इलाज होणे हे गरजेचे असल्याचे हे लक्षात चेवून त्यांचेवर इलाज करून गाढवाचे प्राण वाचवले यामुळे त्यांच्यातील संवेदनशीलता दिसून आली आहे .

आज यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम साठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जात असताना भुसावळ शहराच्या बाहेर एक जखमी अवस्थे मधील गाढव दिसून आले होते, ते वृक्षारोपण मोहीम आटोपून परतत असताना,ते गाढव त्याच जागी आढळून आले, त्याला जखमी असल्याने हालचाल करता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले ,आयुष प्रसाद यांनी गाडीतून उतरून निरीक्षण केल्याच्या नंतर त्यांना गाढव जखमी असल्याचं दिसले
तातडीने त्यांनी शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या पथकाला माहिती देत ,या जखमी गाढवावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या
आणि काही वेळातच या गाढवावर उपचार सुरू झाले
गाढव प्राणी म्हटलं की त्याला कोणतीच भावना नाही की प्रतिष्ठा नाही, उलट गाढव म्हटल की त्याची हेटाळणी केली जाते
मात्र कोणताही उपद्रव नसलेला हा प्राणी अतिशय कष्ट करी तर आहेत,शिवाय अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधे तो माणसाचा मदतीला नेहमीच धाऊन आला आहे,
या सगळ्याची जाणीव ठेवणारे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी नेहमीच आपल्या संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे,मग कुत्रा असो की गाय असो
गाढव असो की मांजर असो
कोणत्याही जीवाचे मोल हे अनमोल आहे आणि त्या जीवाच्या रक्षणा साठी आपण धाऊन जायला पाहिजे
याचा आदर्शच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज गाढवावर उपचार करून घालून दिला आहे
त्यांच्या या संवेदनशीलता बाबत काय बोलावे असा प्रश्न पडतो,
त्यांचा आदर्श घेऊन आपण ही संवेदनशील बनुया