वरणगावातील खुन प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या

( मुस्लीम समाज बांधवानी पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा, मोर्चात महिलाही सहभागी )

वरणगांव

शहरात मंगळवार दि . ४ जून रोजी जुन्या वादाची कुरापत काढून तिघांवर चाकु हल्ला करण्यात आला होता . यामध्ये एकाचा मृत्यू झाला असुन घटनेतील पाच पैकी तिन आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत . तर या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या दोन्ही फरार आरोपींना त्वरीत अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा द्या अशा मागणीसाठी वरणगाव शहरातील मुस्लीम बांधवांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला .

वरणगांव शहरात सहा महिन्यापूर्वी एकाच समाजातील दोन गटामध्ये वाद निर्माण झाले होते . याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती . मात्र, या वादाची धुसपूस दोन्ही गटामध्ये धुमसत असतानांच मंगळवार दि . ४ जुन रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिनेमा रोडवर ( भवानी नगर ) दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून आकीब अली कमर अली ( वय – १९ ) रा गौसीया नगर व राहील सईद सय्यद यांच्यामध्ये वाद निर्माण झाला . यावेळी तिघांनी चाकु व तिक्ष्ण हत्याराने आकीब अली याचेवर चाकूने वार केले तर त्याला वाचवण्यासाठी आलेल्या आरीफ अली समदअली सय्यद व मुश्ताक अली सय्यद यांनाही गंभीर जखमी केले . या घटनेत आरीफ अली समदअली याचा मृत्यु झाल्याने या घटनेची आकीब अली कमर अली यांच्या फिर्यादीवरून वरणगांव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होताच पोलीसांनी राहील सईद सय्यद उर्फ पहेलवान व रेहान खालीद सय्यद, करीम हारून मन्यार यांना अटक केली . तर या घटनेला चिथावणी व जिवे ठार मारण्याची धमकी देणारे मुख्य सुत्रधार अरबाज सय्यद उर्फ पहेलवान, मुजाहीद सय्यद उर्फ इंजिनीअर अद्यापही फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .तर घटनेनंतर शहरात शांतता निर्माण व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीतही गौसीया नगर व इस्लामपुरा भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . यामुळे फरार आरोपींना त्वरीत अटक करून घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीसाठी शहरातील मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी दुपारी तिन वाजता पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला या मोर्चात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या .

विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करावी

वरणगाव शहरात युवकाची झालेली हत्या हि एक शोकांतिका असून या घटनेतील मुख्य सुत्रधारांना त्वरीत करण्यात यावी तसेच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांची नियुक्ती करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी यावेळी केली . मोर्चात जाफर अली ( हिप्पी शेठ ), मकसुद अली सिकंदर अली, अल्लाउद्दीन शेठ, शेख सईद, पप्पू जकातदार, साजीद कुरेशी, इफ्तेखार मिर्जा, अशफाक काझी, इरफान अली, शाहीद शेख यांच्यासह मुस्लीम बांधवांनी पोलीस उपविभागीय अधिकारी किरण शिंदे यांना निवेदन दिले . तर मोर्चेकऱ्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाकडे लेखी आश्वासनाची मागणी केल्याने पोलीसांच्या वतीने त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले .

आरोपींचा शोध घेतला जात आहे

या घटनेतील फरार आरोपींचा कसुन शोध घेतला जात असुन लवकरच त्यांना अटक करण्यात येईल . तर फरार असलेल्या आरोपी बाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीसांना माहीती देवून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उप विभागीय अधिकारी किरण शिंदे यांनी केले . मोर्चा प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी व त्यांच्या सहकारी पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

(

.

.