मूलभूत सुविधांसाठी महिलांचा नगरपालिकेवर एल्गार डिजिटल शहर नको मूलभूत सुविधा द्या; सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख यांच्या नेतृत्वात हजारो महिलांचा मूक मोर्चा

भुसावळ -मूलभूत सुविधांसाठी महिलांचा नगरपालिकेवर एल्गार डिजिटल शहर नको मूलभूत सुविधा द्या; सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख यांच्या नेतृत्वात हजार महिलांचा मूक मोर्चा भुसावळ :-गेल्या अनेक वर्षापासून शिवाजीनगर मिल्लत नगर आगाखानवाडा, पंचशील नगरसह जाम मोहल्ल्या ,खडका रोड परिसरात मूलभूत सुविधा मिळत नाही, याचा आक्रोश होऊन मंगळवारी सकाळी ११ वाजता आगाखान वाडा येथून तर नगरपालिकेवर तब्बल हजार पेक्षा जास्त महिलांनी हंडा घेऊन व विविध फलके घेऊन मोर्चा काढला होता. डिजिटल शहर नको मात्र मुलभूत सुविधा तरी द्या या आशयाची मागणी समाजसेवक रफिक शेख यांच्या नेतृत्वात महिलांनी करत नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी लोकेश ढाके यांच्यासह संबंधित विभागाच्या अभियंतांना निवेदन दिले. प्रभात प्रभाग 15 सह परिसरामध्ये शौचालय नाही, असलेले शौचालय पुरेसे नाही व त्याची साफसफाई होत नाही. शौचालयाची संख्या वाढवून द्यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली पाणी द्या.. पाणी द्या… पाणीसाठी महिलांचा आक्रोश भुसावळ शहराला तापी मायचे वरदान लाभले असून तरीदेखील भुसावळकरांना दहाव्या, अकराव्या दिवशी वेळो अवेळी पाणी येतो व आलेला पाणीही गढूळ असतो ,आता बस झालं.. किती त्रास सहन करायचा यांची हुंकार महिलांनी लावली, पाण्याच्या हंडाभर पाण्यासाठी गल्लोगल्ली फिरावे लागते, यातून भांडण तंटे देखील होतात असेही संतप्त महिलांनी यावेळी पालिकेवर रोष व्यक्त केला तुटलेले कठडे दुरुस्त करा; रस्ते ही बनवा शहरामध्ये ठराविक भाग व परिसर सोडून सर्व दूर विकास काम होत आहे हे योग्य नाही असेही यावेळी गुहार लावण्यात आले तसेच या प्रभागामध्ये नाल्यावरील कठडे तुटलेले आहे यामुळे पाणी सरळ घरामध्ये शिरतो अनेक वेळा तुटलेल्या कठड्यामुळे मुलं नाल्यात पडतात मागे अशीच एक घटना घडली होती यातून एकाला आपले जीव गमवावे लागले होते त्वरित तुटलेले कठडे दुरुस्त करा याशिवाय या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रस्ते झाले नाही सर्वत्र खड्डे आहे त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली . मागण्या मागण्या नाही झाल्यास जिल्हाधिकाऱ्याला मोर्चा घेऊन जाण्यात येईल असे यावेळी मोर्चेचे नेतृत्व करणारे रक्षक यांनी सांगितले प्रशासनातर्फे लवकर कामाला लवकरच कामाला सुरुवात होईल असे आश्वासन देण्यात आले. पोलिसांचा चौक बंदोबस्त मोर्चा आगाखानबाडा, अमरदीप चौक, बाजारपेठ पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय या मार्गावरून नगरपालिकेपर्यंत पोहोचला यावेळी अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.