वरणगाव – शहरातील नागरिकांना पंधरादिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद कार्यलयात भेट देत पाणी पुरवठा विभागाला उपाय योजनेच्या सुचना दिल्या तर माजी नगर सेवकांनी शहराच्या समस्या त्यांच्या समोड मांडल्या

तपत कठोरा येथून होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेवरील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरात पाणी पुरवठा पंधरा दिवसांनी होत असल्याने मा जिल्हाधिकारी यांनी हतनुर जलाशय प्रशासनाला आदेश देत आवर्तन सोडण्यात आले होते मात्र तरीही पाण्याची समस्य होती याची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे नगर परिषद कार्यालत भेट देत मुख्याधिकारी सचिन राऊत व पाणी पुरवठा अभियंता पवार यांच्या कडून आडचणी जानून घेत पाणी पुरवठ्यासाठी लवकारात लवकर उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या तर नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन अंथरण्यासाठी शेतकऱ्याना कडून , आयुध निर्माणी प्रशासना कडून , राष्ट्रीय महामार्गाच्या रेल्वेच्या अडचणी असल्यास संमधीत अधिकाऱ्या सोबत बैठक घेऊन किंवा थेट पत्र व्यवाहर करून त्या बाबत माहिती द्यावी शहरातील विकास कॉलनी , व प्रतीभा नगर येथील जलकुंभाच्या स्थानिक नागरिकाच्या अडचणी असल्यास त्या दुर करण्याच्या सुचना प्रशासक जितेंद्र पाटील यांना दिल्या तर माजी नगर सेवकानी जिल्हाधिकारी यांच्या समोर शहरातील विविध भागात असलेल्या समस्या माडल्या त्यात बांधकाम अभियंता यांची नियुक्ती करण्यात यावी , स्वच्छालयात पाणी नसल्याने त्या समोर टुब वेल देणे , घरकुल लाभर्थीना राज्य सरकार सोबत केंद्र सरकारचा निधी देण्यात यावा , पाणी पुरवठा योजनेसाठी एक्सप्रेस फिडर मंजुर करणे व भोगावती नदी पात्र स्वच्छ करणे नारीमळा व . शिवाजी नगर मधील जलकुंभ सुरू करणे , पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने करणे , शहरात भुमीगत गटरी करून सांडपाणी व्यवस्थापन प्रल्कप सुरू करावा , बस स्थानक ते रेल्वे स्टेशन वर दुभाजक टाकून पथ दिवे लावले ,साडेतेरा कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्यात यावी अशा अनेक समस्या या वेळी जिल्हाधिकारी यांच्या समोर माजी नगर सेवकांनी मांडल्या
यावेळी सुनिल काळे , शे अखलाक शे युसुफ , राजेद्र चौधरी , सुधाकर जावळे , अरुणाबाई इंगळे आदी होते


