महिलांमुळेच आपली संस्कृती टिकली आहे -वैशाली दिदी

सावदा -आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. घराला घरपण हे देखील महिलांमुळेच मिळते आहे. जी आपली संस्कृती टिकली आहे ते सुद्धा महिलांमुळेच असे मत सावदा येथील ओम शांती केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारीय वैशाली दिदि यांनी व्यक्त केलं त्या कोचूर येथील “सन्मान नारीशक्तीचा” या कार्यक्रमात बोलत होत्या कोचुर येथे बोरखेडा सिम येथील सभागृहात महिलांतर्फे नारीशक्तीचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग, सावदा येथील ओम शांती केंद्र संचालिका वैशाली दीदी, सावदा येथील मा. नगराध्यक्ष रेखा वानखेडे, सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सिमसन वानखेडे, सरपंच ज्योती कोळी, उपसरपंच रेशमा तायडे, मा. सरपंच स्वाती परदेशीं, पोलीस पाटील मनीषा पाटील,शिक्षिका संगीता गोसावी, ग्रापं ऑपरेटर कविता तायडे. यांच्यासह गावातील मोठ्या महिला उपस्थित होत्या.
पुढे वैशाली दीदी म्हणाल्या की सर्व महिला एक शक्ती आहोत. या शक्तीशिवाय शिवही अपूर्ण आहे. त्यामुळे त्या शक्तीला न दाबता तिचा योग्य स्थळी आपण वापर केला पाहिजे.
तर सिमरन वानखेडे म्हणाल्या सर्व महिलांनी एकमेकीला साथ देत आपली स्पर्धा पुरुषांशी केली पाहिजे. आपण कुठल्या क्षेत्रात कमी नाही आणि आपण स्वतःला कमी देखील लेखायचं नाही.
जालिंदर पळे यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.या वेळी लहान मुलींनी जिजामाता,सावित्री माता, सिंधू ताई सपकाळ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,रमाबाई आंबेडकर यांची वेशभूषा साकारली होती या वेशभूषणे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते
यावेळी अंगणवाडी सेविका,मदतनीस आशा वर्कर,महिला शेतकरी तसेच महिला भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनीता पाटील यांनी केले तर आभार मनीषा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती चौधरी रूपाली चौधरी सविता तायडे यांनी परिश्रम घेतले.