सत्काराने भारवल्या भुसावळ तालुक्यातील सीआरपी माता भगिनी :प्रतिष्ठा महिला मंडळ व भाजपा महिला मोर्चा तर्फे नारीशक्ती वंदन व हळदी कुंकू संपन्न :


भुसावळ – येथील प्रतिष्ठा महिला मंडळ व भा ज पा महिला मोर्चा तर्फे नारीशक्ती वंदन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भुसावळ तालुक्यातील सर्व सी आर पी महिलांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या आंगणवाडी सेविका मददनिस व आशा वर्कर यांचा सुध्धा सत्कार करण्यात आला व उपस्थित सर्व माता भगिनींना हळदी कुंकू देवून वाण देण्यात आले.प्रसंगी सत्काराने भुसावळ तालुक्यातील सीआरपी माता भगिनी भारवून गेल्या .

नेहमी शासनाने दिलेली कामे अत्यंत प्रामाणिकपणे करणारे व शासनाच्या योजना घराघरात पोहचवणाऱ्या या महिलांचे योगदान महत्वाचे आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात सांगून महिला करीत असलेल्या कामांचे भर भरून कौतुक केले. यावेळी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या सर्व योजना त्यातच महिलांना करिता असलेल्या योजनांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली.व बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण कसे होत आहे ते आमदार सावकारे यांनी सांगितले.नारी सशक्त तर देश सशक्त हा नारा देत महिलांच्या सशक्तीकरणाला प्राधान्य देत महिलांचा उत्साह वाढविला.

या कार्यक्रमात राहुल ठोसर यांनी उपस्थित महिलांना राज्य व केंद्रशासनाच्या वेगवेगगळ्या योजनांची माहिती दिली व महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, सौ रजनी सावकारे,तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष युवराज लोणारी,संजय पाटील,परिक्षीत बऱ्हाटे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, कठोराच्या सरपंच रोहिणी पाटील,मीना लोणारी,सोनल महाजन,प्रितमा महाजन,दिपाली बऱ्हाटे,माजी सभापती प्रिती पाटील,मनीषा पाटील,वंदना उन्हाळे,अनिता सपकाळे,रेखा सोनवणे,रेखा बोंडे,सारिका चौहान , बेलव्हाय सरपंच सौ खाचणे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठा महिला मंडळ च्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले तसेच या कार्यक्रमात महिलांनी लक्षणीय उपस्थिती दिल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. मंडळा तर्फे दरवर्षी हळदी कुंकवाचे कार्यक्रमात सेविका, मदतनीस,आशा व सी आर पी यांचा यथोचित सन्मान देण्याचा प्रयत्न करून कृतघ्नता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच शासनाच्या योजनांची माहिती देवून महिलांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो.
सूत्रंचालन राजश्री देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिता आंबेकर,सोनल महाजन,जयश्री चौधरी,वैशाली भगत, वैशाली सैतवाल, पल्लवी वारके ,रंजना परदेशी यांनी प्रयत्न केले.