भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे वाहतूक सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा : सुरक्षितपणे घरी जा, घरी आपली वाट बघत आहेत – मोहन आव्हाड,मुख्य अभियंता

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे वाहतूक सुरक्षितता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखाना परिसर आणि वसाहती मध्ये जागरूकता बॅनर लावण्यात आले. अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांना रोड सेफ्टी बेजेस लावण्यात आले.

यावेळी संच क्र.४ आणि ५ च्या प्रवेशद्वारावर मोठा जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. केंद्राचे सुरक्षितता अधिकारी मोहन सरदार यांनी वाहतूक सुरक्षा बाबत माहिती देऊन भारत जगातील रस्ते अपघातात प्रथम क्रमांक, सरासरी ३ अपघातांमध्ये १ मृत्यु यामुळे जीवहानी सोबत मोठी आर्थिक आणि सामाजिक हानी होते. आपल्या जीडीपीच्या 3.5 टक्के नुकसान या अपघातामुळे होते जेव्हा मी आम्ही 3 टक्के शिक्षणावर खर्च करतो अशी महत्वपूर्ण माहीती दिली.

वाहने सावकाश चालवा. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा. लक्षात ठेवा घरी आपली कोणी वाट बघत आहेत. असे भावनिक आवाहन मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी केले. यावेळी कंत्राटी कामगारांसोबत त्यांनी संवाद साधला, त्यांना अपघातामुळे किती भयानक स्थिती निर्माण होते. कुटूंबियांचे किती हाल होतात या बाबत प्रेमाने जवळ बोलावून माहीती दिली. त्यांच्या इतर समस्या जाणून घेतल्या. यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

यावेळी उपमुख्य अभियंता प्रशांत लोटके, राजेश दुथडे तसेच अधिक्षक अभियंता सुमेध मेश्राम, हेमंत लहाने, अतुल पवार तसेच सर्व विभाग प्रमुख , संघटना प्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरक्षितता विभागाचे मिलिंद खंडारे, छगन पवार, प्रितिलाल राठोड, मोहिनी फेगडे यांनी परिश्रम घेतले.