भुसावळ – नागरिकांनी गावी जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्यावी तसेच नागरिकांनी परिसरात काही संशयास्पद हालचाली आढल्यास याबाबत त्वरित पोलिस ठाण्यात वा पोलिसांना संपर्क साधून माहिती द्यावी असे भुसावळ बाजारपेठचे पोनि राहुल गायकवाड यांनी कळवीले असून
सध्या दिवसेंदिवस शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे त्यात चोरांनी बंद घरांना टार्गेट केलेले निदर्शनास आल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे .
आवाहनात प्रामुख्याने सूचना केली आहे की , गावी जाताना घराचे दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची/ केल्याची खात्री करा.
आपण गावी जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्या. शिवाय, आपली आवश्यक ती माहिती त्यांच्याकडे असू द्या. उदा. मोबाइल नंबर, कार्यालयाचा पत्ता, जवळच्या नातेवाइकांचा पत्ता इ.
जास्त काळ बाहेरगावी जायचे असल्यास नातेवाइकांना, शेजाऱ्यांना घर सांभाळायला किंवा बंद घरी झोपायला सांगा.
घरातील पैसे, दागिने व मौल्यवान चीजवस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. घराच्या चाव्या सोबत घेऊन जा.
लॉकरमध्ये ठेवणे शक्य नसल्यास चोराला सहजासहजी सापडेल किंवा सामान्यत: सर्वजण जेथे ठेवतात अशा ठिकाणी ठेऊ नका, जसे कपाट, बेड, किचनमधील डबे यातील वस्तू चोरांना सापडणे सहजशक्य होते.
दिवसाच्या घरफोड्या दुपारी १२ ते सायंकाळी ०६ या वेळेत होत आहेत, यावेळे घराबाहेर जातांना शेजाऱ्यांना लक्ष ठेवायला सांगूनच बाहेर जावे. नोकरांबाबत काळजी घ्या.
घरातील वा दुकानातील नोकरांचे संपूर्ण नाव, गाव, वय, राहण्याचा पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, बोटाचे ठसे व संपर्क क्रमांक घेऊन ठेवा. शिवाय, ही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यातही द्या.
आणि महत्त्वाचे म्हणजे घरातील नोकरांसमोर आपल्या पैसे, दागिने अर्थात संपत्तीचे प्रदर्शन टाळावे. कपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागू देऊ नका.असेही बाजारपेठ पोलिसांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे कळवीले आहे .



