भुसावळ – मागील दोन वर्षात कोविडच्या दुष्परिणामामुळे पक्षातील सर्व कार्यरत पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यात अंतर वाढले हे अंतर कमी होवून संघटन मज़बूतीसाठी समन्वय साधून पक्षाची ताकद वाढावी यासाठी शिव संपर्क अभियानांतर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय दौरे करण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर 15 जणाची टिम आहे.
शिवसेनेच्या बळकटीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जितावस्था आणण्यासाठी आणि समन्वय साधण्याचा दृष्टिकोनातून हा दौरा आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात शिवसेना जोमाने उभी राहिली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. या भूमिकेतून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीचे दौरे केले जात असल्याची माहिती कोल्हापूर येथील शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

शिवसेनेच्यावतीने संपुर्ण राज्यभरात शिव संपर्क अभियान राबविले जात आहे. यानिमित्त रावेर लोकसभा मतदार क्षेत्राच्या दौऱ्यावर आले असता, खा. माने यांनी पत्रकार परिषद घेऊन अभियानाची माहिती दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जळगाव माजी उपमहापौर गजानन मालपुरे , महिला आघाडी संपर्क प्रमुख उषाताई मराठे उपस्थित होते.
यावेळी खा. माने म्हणाले, शिवसेनेचे 18 खासदार या सर्व संपर्क दौर्यामध्ये क्रियाशील आहेत. यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून खालच्या पातळीवर प्रत्येक जि.प व पंचायत समिती गणनिहाय व गट निहाय आमची यंत्रणा त्या ठिकाणी जाणार आणि त्यांच्याकडून जो डेटा कलेक्ट होईल तो पक्ष संघटनेकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे सांगितले.
पक्षाची नविन संकल्पना पुनरबाँधनी
शिवसेना पुनर्बांधणीच्या दृष्टिकोनातून जिथे जिथे पक्ष मागे पडला आहे , तसेच ज्या ठिकाणी चांगले काम सुरू आहे. मात्र काही कारणात्सव तिथे कार्यकर्त्यांची ताकद कमी पडते असा सर्व ठिकाणची माहिती घेऊन काम सुरू केले आहे. गेल्या दोन वर्षात कोविडच्या काळात सर्वच पक्षांचा संपर्क कमी झाला होता. त्यामुळे आता पुन्हा जोमाने शेवसेना कार्यास लागली असून संपर्क अभियाणाच्या माध्यमातून काम सुरू करून शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी केली जात असल्याचे खा. माने म्हणाले.
पक्षाचे आमदार वाढविण्यासाठी प्रयत्नशील –
मागील काळामध्ये ज्या मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणुका लढवू शकला नसेल, येथील कार्यकर्ते बॅकफूटवर गेले आहेत. त्यामुळे आता पुढील काळात योग्य ती माणसे डोळ्यासमोर ठेवून पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या दौऱ्याचा संपूर्ण अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला जाणार आहे.
राज्यातील २८८ पैकी ज्या मतदारसंघात पक्ष मागे पडला आहे तिथे विशेष जोर दिला जाणार आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना आपली संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न होत आहे. राज्यात जास्तीत जास्त जागा वाढविण्यासाठी धोरण राबवले जात असल्याचे खा. माने यांनी सांगितले.
लोकसभा हे अंतिम उद्दीष्ठ
लोकसभा निवडणूक हे अंतिम उद्दिष्ट असून, यासाठी ग्रामपंचायत पातळीपासून प्रयत्न झाले पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा अशा पद्धतीने संघटन मजबूत करून सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, यासाठी घराघरात बुथ लेव्हलचा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे. यासाठी पक्षाकडून आखणी केली जात आहे. प्लॅनिंगच्या आधारे ज्या मतदारसंघात शिवसेना काठावर आहे. त्या ठिकाणी विशेष जोर देऊन आमच्या पक्षाचे खासदार संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही खासदार माने यावेळी म्हणाले.


