के नारखेडे महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) येथील के नारखेडे महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने “विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास” कार्यशाळेचे दहा दिवसा चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घटनास अध्यक्ष स्थान शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे हे होते तर उद्घाटक व वक्ते म्हणून विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्राध्यापक डॉ. अजय सुरवाडे (स्कूल ऑफ कंप्यूटर सायन्सेस क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभा समन्वयक प्रा ज्योती पाटील यांनी केले. व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी. व्ही. पाटील व संस्थेचे सदस्य विकास पाचपांडे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा गाजरे उपस्थित होत्या. या व्याख्यानमाला कार्यक्रमास तीन व्याख्याता बोलवण्यात आले होते. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प डॉ. अजय सुरवाडे यांनी गुंफले यात त्यांनी सोशल मीडिया चा वापर यासंबंधी माहिती दिली प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, शिक्षणाने भाषा कौशल्य तसेच अनेक युक्ति आत्मसात करता येतात व सोशल मीडियाच्या फसव्या जाहिराती पासून कसे लांब राहायचे, त्याचे फायदे व तोटे तसेच अनेक वेबसाईट बद्दल त्यांनी माहिती दिली. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प नाहाटा महाविद्यालयाच्या डॉ. ममता पाटील यांनी गुंफले त्यात त्यांनी राष्ट्रीय एकता व एकात्मता या विषयावर बोलताना राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? , कोरोना काळात आपण एकात्मता शिकलो असे त्यांनी सांगितले. तर तिसरे पुष्प प्रा. डॉ. सुरेंद्र विनायक कापसे यांनी गुंफले ताण तणाव मुक्त परीक्षा या विषयावर बोलत असताना विद्यार्थीदशेत असताना प्रथम ध्येय निश्चित करा, विषय निवड महत्वाची, वाचन महत्त्वाचे, वाचाल तर वाचाल असा सल्ला त्यांनी दिला. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ए. जी. श्रीवास उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनल पाटील यांनी तर आभार प्रा. तेजस्विनी पिसाळकर यांनी केले.