शिधापत्रिका धारकांना १२ अंकी क्रमांक देऊन अन्न सुरक्षा प्राधान्य यादीत समाविष्ट करा… प्रा. धीरज पाटील

भुसावळ – येथील श्री नगर, भोई नगर, गणेश कॉलनी, खळवाडी, विद्यानगर, नारायण नगर, अयोध्या नगर, हुडको कॉलनी, रेल दुनिया, भिरूड कॉलनी, जळगाव रोड परिसरातील अनेक केसरी शिधापत्रिका धारकांना अद्यापपर्यंत १२ अंकी क्रमांक मिळालेला नाही तसेच अनेक ग्राहकांची नावे अन्न सुरक्षा प्राधान्य योजनेत समाविष्ट नसल्याने ते धान्य मिळण्यापासून वंचित राहतात. या प्रक्रियेत दिरंगाई होत आहे, तहसील कार्यालयाच्या फेऱ्या कराव्या लागतात अश्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. शिधापत्रिका धारकांना १२ अंकी क्रमांक द्यावा तसेच धान्य मिळण्याच्या अन्न सुरक्षा प्राधान्य योजनेत नावे समाविष्ट करावी अशी मागणी शिवसेना तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांनी भुसावळ तहसील विभागाला केली आहे.
प्रसंगी मनोज भोई, प्रवीण भोई, प्रभाकर वाणी, दलाल दत्तात्रय, अरुण भंगाळे,मनोज भोई, लक्ष्मीकांत इंगळे, विलास पाटील, गौरव कोळेकर, गजानन भोळे, मोहन वारके, निलेश मालवीया, संदिप वारके, अशोक जवरे, दिपक पांडव, गजानन पोतदार, दिपक चौधरी, विद्या बेंडाळे, तेजस ठोके, प्रमोद सोनार, हेमराज वासुदेव भोळे, सोपान चरहाटे, मनोज नेहेते व नागरिक उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख महाजन यांची अधिकाऱ्यांशी चर्चा:
रेशन कार्ड संबंधित समस्या वर्षानुवर्षांपासून लोकांना भेडसावत आहे. समस्या सोडविताना वैयक्तिक नागरिक अनेक अडचणींना तोंड देत होते. त्यावर फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी महसूल विभागाचे नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांच्याशी चर्चा केली.