भुसावळात जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 55 दाव्याचा निपटारा :


भुसावळ – येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 11 डिसेंबर शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
” सामंजस्य व तडजोडीने जीवन सुखी बनवूया, भांडण्यापेक्षा समझौता बरा__ त्यातच आनंद खरा” या उक्तीप्रमाणे प्रलंबित दावे व दाखल पूर्व प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आले होते. यात वित्तीय संस्थांचे अधिकारी, ग्रामपंचायत व नगरपालिका यांचे प्रतिनिधी यांनीही सहभाग नोंदविला व अनेक प्रकरणात निपटारा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला.
भुसावळ जिल्हा न्यायालयात दोन सदस्य पॅनलचे नियोजन या दाव्याच्या निपटारा करण्यासाठी केला होता. दाखल पूर्व 2432 प्रकरणे होती त्यापैकी ३० निकाली निघाली यात 11,26,1220 रू.वसुल मिळाला दाखल खटले 1084 होती त्यापैकी 25 निकाल आपसात समझोत्याने काढण्यात आली यात 37,50,686 रक्कम वसूल झाली . अशी एकूण 44,76,808 रुपयांची 55 दाव्यामधून वसुली झाली
लोक अदालतीत एस पी डोरले जिल्हा न्यायाधिश उपस्थित होते. दोन सदस्यीय पॅनल 1 मध्ये श्री आर एम जाधव अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, ॲड जास्वंदी भंडारी (पाटील) पॅनल 2 मध्ये आर आर अहिर दुसरे सहदिवाणी व.स्तर न्यायाधिश , ॲड वैशाली सोनवणे ,पॅनल तीन मध्ये श्री द भा डोमाळे दुसरे सह. दिवाणी न्यायाधीशक.स्तर, ॲड कृष्णा सिंग ठाकूर यांनी काम पाहिले. ॲड श्री तुषार पाटील, अध्यक्ष भुसावळ वकील संघ,ॲड जास्वंदी भंडारी महिला प्रतिनिधी, श्री सतीश पाटील, श्री जगदीश मानकर , श्री राहुल पाटील व‌ कर्मचारी वृंद यांनी राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.