.

भुसावळ -पुस्तक संपन्न करतं माणसाचं मस्तक. संपन्न मस्तक कुणाचही होत नाही हस्तक. जो कोणाचाही होत नाही हस्तक. त्याच्याच पुढे अवघ जग होतं नतमस्तक. अशा महामानवाचे नाव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांच्या सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर अनेक देशातल्या विद्वानांनी प्रकाश टाकला आहे.. परंतु देशभक्त बाबासाहेब हा त्यांचा पैलू दुर्लक्षित राहिला. बाबासाहेबांनी वेळ प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं,
परंतु कुठलाही निर्णय घेताना प्रत्येक क्षणी.त्यांच्या डोळ्यापुढे राष्ट्र हितच होतं. त्यांना भारत प्राणाहून प्रिय होता. असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांनी केले.
ते भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात एन एस एस अधिक दोन स्तर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.मोहन भाऊ फालक , चेअरमन महेश भाऊ फालक, सचिव विष्णू भाऊ चौधरी, खजिनदार संजय कुमार नाहाटा जी, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा शोभा तळेले, कार्यक्रम अधिकारी डॉ.भाग्यश्री भंगाळे, समन्वयक प्रा टी एस सावंत, समन्वयक आर एम खेडकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रा एम एच सरोदे, प्रा व्हि.डि.सावकारे प्रा जे.डी धांडे, प्रा ललिता राणे. प्रा.एल पी टाक, प्रा आर पी मसाने, प्रा एच बी राजपूत, प्रा . एन झेड रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्रा सुरवाडे म्हणाले की, राष्ट्रपुरुष यांना कधीच जाती-धर्मांमध्ये वाटून घ्यायचे नसते. बाबासाहेबांनी महिला, कामगार वर्ग ,विद्यार्थी वर्ग,दलित पीडित शोषित वंचित दीनदुबळ्या समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी काम केलं. राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांना मल्हार पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ.भाग्यश्री भंगाळे यांनी केलं. .


