सीआरपीएफ जवानांच्या एकात्मता सायकल रॅलीचे भुसावळात जंगी स्वागत ;


भुसावळ – देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यवर्ष तसेच 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने 12 ऑक्टोंबरला गडचिरोलीमधून निघालेली सीआरपीएफच्या पंचवीस जवानांची सायकल रॅली
देशातील सर्वधर्मीयांमधील एकात्मता व अखंडता अबाधित राहावी हा मुख्य संदेश घेवून निघाली या रॅलीचे गुरुवारी भुसावळात आगमन झाले यावेळी पोलिस विभाग व नागरिकांतर्फे व विविध संघटनातर्फे भारत माता की जय ‘ वीर जवान अमर रहे , च्या इन्कलाब झिंदाबाद च्या गगनभेदी घोषणा देवून फुलांचा वर्षाव करीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या .

सायकल रॅलीचे केले जंगी स्वागत
ही सायकल रॅली येथील नाहाटा चौफुली येथे दाखल झाल्यानंतर या रॅलीचे उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे , तालुका पोलिस निरीक्षक विलास शेंडे पोलिस अधिकारी कर्मचारी
जंगी स्वागत करण्यात आले.
या सायकल रॅलीचे नेतृत्व अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीचे सुपुत्र असिस्टंट कमांडंट डॉ. चेतन शेलोटकर यांचे नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली आहे .
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी व गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. 31 तारखेला ही रॅली गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया येथे दाखल होणार आहे. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता दिवस हा कार्यक्रम होईल.
राष्ट्रीय एकता दिवस सायकल रॅली1100 किमीचा प्रवास
या रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, फिजिकल फिटनेस जनजागृती, देशाचीअखंडता, देशभक्ती, देशप्रेम निर्माण करणे तसेच पर्यावरण वाचवणे व सैनिकांना श्रद्धांजली वाहणे हे या सायकल रॅलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. 12 ऑक्टोंबरला निघालेली ही सायकल रॅली जवळपास वीस दिवसांचा प्रवास करून ही सायकल रॅली गुजरात मधील केवडिया येथे दाखल होणार आहे. गडचिरोलीवरून निघालेली जवानांची सायकल रॅली अंदाजे बारा ते तेरा जिल्ह्यांमधून जाणार असून अकराशे किलोमीटर अंतर पार करणार आहे. नागपुर, अमरावती , अकोला , बुलढाणा, मलकापुर खामगांव मार्गे भुसावळ येथे आली.
प्रत्येक जिल्ह्यात या रॅलीचे स्वागत होणार असून गुरुवारी भुसावळ शहरात आगमन झाल्यानंतर या रॅलीचे शहरवासियांनी अतिशय सुंदर व आपलेपणाने स्वागत केले भूसावळकरांचे आदरतिथ्याने मन भारावले व आमचा उत्साह द्विगुणित झाल्याची प्रतिक्रिया कैप्टन यांनी यावेळी व्यक्त केली.
भुसावळात विविध ठिकाणी या सायकल रॅलीचे स्वागत केले . आजादी अमृत महोत्सव दरम्यान ही रॅली गुजरात येथील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकाजवळ समारोप होणार आहे

12 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथून या रॅलीस राज्यपाल यांचे हस्ते सुरवात झाली
यावेळी रॅली मध्ये पोलिस अधिक्षक (सेकंड इन कमांडर ) महेश कुमार , अप्पर पोलिस अधिक्षक संजय बामोला , चीफ मेडिकल ऑफिसर शैलेंद्र कुमार सिंह , सहाय्य्यक कमांडर शरद घड्याळे , सीआरपीएफ रॅली कमांडर( कैप्टन) चेतन शेलूरकर , सहाय्य्यक कमांडर संजय कदम , आर्मी कर्नल राजू चौधरीं ,आदीं सहभागी होते
उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे , शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे , तालुका पोलिस निरीक्षक विलास शेंडे , यांचेसह सपोनी स्वप्निल नाईक , पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
सीआरपीएफ जवान यांची देशाची एकता व अखंडता प्रदर्शीत करण्यासाठी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत 25 सीआरपीएफ जवान यांचेसह अधिकारी यांचा सहभाग आहे .
दरम्यान, नाहाटा चौफुली परिसरात भुसावळ दक्षता समिती महिला , भुसावळ रनर्स टीम , आर्या फाउंडेशन , भुसावळ महिला क्रीडा संघ , विविध सामाजिक संघटना व पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतषबाजी करून रॅलीचे स्वागत करण्यात आले. महिलांनी रॅली मधील अधिकारी व जवानांचे औक्षण करून फुलांची उधळन करीत स्वागत केले .
तदनंतर बियाणी मिल्ट्री स्कुल येथे आयोजित भव्य स्वागत व सत्कार समारंभ पार पडला.यावेळी व्यासपीठावर पोलिस अधिक्षक (सेकंड इन कमांडर ) महेश कुमार , अप्पर पोलिस अधिक्षक संजय बामोला , चीफ मेडिकल ऑफिसर शैलेंद्र कुमार सिंह , सहाय्य्यक कमांडर शरद घड्याळे , सीआरपीएफ रॅली कमांडर( कैप्टन) चेतन शेलूरकर , सहाय्य्यक कमांडर संजय कदम , आर्मी कर्नल राजू चौधरीं , यांचेसह उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे ,व अधिकारी उपस्थीत होते . यावेळी
मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले .
प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांचेसह बियाणी उद्योग समुहाचे विनोद बियाणी , रौनक बियाणी,मनिष बियाणी व सहकारी यांनी केला .
शहीद पत्नी यांचा सत्कार पोलिस दिनाचे औचित्य साधून मान्यवरांचे हस्ते शहीद पत्नी यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये श्रीमती भारती जितेंद्र कोल्हे , अर्चना महाजन , प्रतिभा शांताराम जंगले , फरीदा बी , रंजना निवृत्ती भारंबे, तसेच विठ्ठल आनंदा वाणी , विलास जनार्दन ढाके ,यांचाही सत्कार करण्यात आला .
यावेळी प्रमुख मान्यवरांनी मनोगतातून देशाची अखंडता, एकता कायम अबाधित राहावी यासाठी सर्व धर्मीय नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना रुजवण्याकरीता निघालेल्या जवानांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या .तसेच रॅलीला ठीकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे सांगीतले व यामुळे
जवानांना सुद्धा प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगीतले .
यावेळी बियाणी मिल्ट्री स्कूल च्या विद्यार्थ्यांनीं सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .
दरम्यान बियाणी मिल्ट्री स्कूल येथील मुक्कामा नंतर आज शुक्रवार रोजी रॅली पुढे मार्गस्थ झाली .