राजस्थानी वि.प्र.नवयुवक मंडळ तफै सीआरपीएफ रॅलीचे पुष्प उधळून स्वागत.


भुसावळ – भारतीय स्वतंत्रतेचा अमृत महोत्सवानिमित्त देशाची राष्ट्रीय एकात्मता व अखंडता रहावी या करिता सीआरपीएफ जवान कडून १२ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा हस्ते शुभारंभ करुन गडचिरोली येथून सुरू झालेली सायकल रॅली १० दिवसाचा प्रवास करत दि २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४:०० वाजे सुमारास भुसावळ शहरात पोहोचली, बियाणी स्कूल येथे विश्रांती घेऊन सकाळी ९:३० वा.ही रॅली नाहाटा काँलेज जामनेर रोड,यावल रोड मार्गे केवडिया गुजरात येथे प्रस्थानासाठी निघाली या वेळी यावल नाका येथे राजस्थानी वि.प्र.नवयुवक मंडळ चे अध्यक्ष विनोद शर्मा यांच्या वतीने गांधी पुतळ्यास रॅली प्रमुख कँप्टन चेतन शेलोटकर यांचा हस्ते पुष्पमाळ अर्पण करण्यात आले तसेच विनोद शर्मा यांचा हस्ते संपूर्ण सायकल रँलीवर पुष्पवृष्टी करुन भव्य स्वागत करण्यात आले,या वेळेस वाजंत्री किशोर गुरव व मंडळी यांनी सनई वाद्य्याने स्वागत केले नंतर जल्लोषात भारत माता की जय असे जयघोष करत सायकल रँली ला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सदर कार्यकमास भुसावळ चे ज्येष्ठ समाजकर्ते जे.बी कोटेचा,सुमेंद्र धौसले,विजय सावदेकर,सुरेश अग्रवाल,सुनील ठाकूर,गुड्डू पवार,राजा टाक,रामु तायडे,गोविंदा शर्मा,अनिल अग्रवाल,पंकज तायडे,मधुकर डिवरे व शैलेंद्र बमले (पप्पु भैया) उपस्थित होते.