नवी दिल्ली – (आर डी चौधरी) – बृहन्महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या वतीने तेली समाजास एन टी मध्ये समावेश व्हावा या मागणी साठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर २०२१ रोजी जंतर मंतर दिल्ली येथे एक दिवसीय धरणा आंदोलन संघटनेचे अध्यक्ष विलासराव वाव्हळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले,

यावेळी श्री वाव्हळ विचार मांडताना सांगितले की तेली समाज हा मुळातच सुरुवातीला भटक्यांमध्ये मोडला जात होता परंतु राजकीय लोकांनी ओ बी सी मध्ये तेली समाजास टाकून दिले. आता ओबीसी आरक्षण मध्ये जवळपास ३४७ जातींचा या आरक्षणामध्ये सामावेश करण्यात आला आहे, त्यामुळे मुळ ओ बी सी वर अन्याय होत आहे याकरीता तेली समाजाचे मुळ एन टी चे आरक्षण पुन्हा करावे अशी मागणीही यावेळी केली,
नाशिक विभाग बृहन्महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे उपाध्यक्ष आर डी चौधरी यांनी विदर्भात तेली समाज एन टी होता मग खान्देश, मराठवाडा, मुंबई, कोकण मधील तेली समाजावर अन्याय का ?असा प्रश्न उपस्थित केला . यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष विलासराव वाव्हळ, महिला अध्यक्षा सौ लता कोलते, सरचिटणीस दिलीप खोंड, डॉ लक्ष्मण चौधरी, महाराष्ट्र सचिव प्रशांत चौधरी,
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ लता महाले, औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्षा सौ वनिता गायकवाड होते,
आंदोलनात महाराष्ट्रातून चाळीसगाव शहराध्यक्ष सुनील चौधरी, उपाध्यक्ष दिनेश चौधरी, रविंद्र चौधरी,उमेश चौधरी, जगदिश चौधरी, डॉ विजय चौधरी, भाऊराव चौधरी, रविंद्र चौधरी,सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते .


