ज्ञानदानाचे कार्य करणारा राष्ट्राचा आधारस्तंभ शिक्षक- प्रा.डॉ.सत्यजित साळवे

         

भुसावळ- येथील कला विज्ञान आणि पु ओ नहाटा वाणिज्य महाविद्यालयातील स्टॉफ अकॅडमी तर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रा . सत्यजित साळवे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते . प्रा . साळवे यांनी “शिक्षक काल आज आणि उद्या” या विषयावर भाष्य केले .
आपल्या भाषणात त्यांनी प्राचीन काळापासून जरी शिक्षण पद्धत अस्तित्वात असली तरी समाजातील मूठभर लोकांनाच शिक्षण देण्याचा आणि घेण्याचा अधिकार होता .
द्रोणाचार्य आणि एकलव्याचे उदाहरण देऊन त्यांनी डिस्टन्स एज्युकेशन तेव्हापासून अस्तित्वात होते अशी मांडणी केली .
एकलव्यावर झालेला अन्याय हा पुरातन शिक्षण पद्धतीतील एक मोठा आघात होता . नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रात समाजातील काही घटकांनी शिक्षण घ्यावे , काहींनी शस्त्र चालवावी, काहींनी व्यापार करावा, तर काहींनी सेवा करावी अशी व्यवस्था निर्माण झाली . संत तुकाराम , कबीर यांचा नाम उल्लेख करून शिक्षण पद्धतीत झालेल्या बदलांवर त्यांनी भाष्य केले . शिवाय महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाचे दालन खुले केले .
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला . संविधानात शिक्षण सक्तीचे करण्यात तर आलेच शिवाय सर्वांना शिक्षण मोफत मिळेल अशी तरतूद करण्यात आली . शिक्षणाचे राष्ट्रीय करण झाले पाहिजे अशीही तरतूद संविधानात केलेली आहे याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली .
परंतु पुढे 1986 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण अस्थित्वात आणि शिक्षणाच्या खाजगी
करणाला सुरुवात झाली .
विनाअनुदानित तत्वावर शाळा महाविद्यालय सुरू झालीत.आणि शिक्षण सम्राट निर्माण झालेत .
2019 20 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तर शिक्षणाचे पूर्णपणे बाजारीकरण करण्याचा घाट घातला जात आहे . भांडवलदारांच्या ताब्यात संपुर्ण शिक्षण व्यवस्था देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे .
स्किल इंडियाच्या नावाखाली कुंभाराच्या मुलाने कुंभार व्हावे ,सुताराच्या मुलाने सुतार व्हावे असे षड्यंत्र नवीन शैक्षणिक धोरणात आहे . या धोरणाचा परिणाम बहुजनांवर होणार असून बहुजनांची मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतील अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे .
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 40% ऑनलाईन आणि 60 टक्के ऑफलाईन अशी ब्लेंडेड शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे .

याला वाचा फोडण्याचे काम शिक्षकांचे आहे .
शिक्षण घेणे हा सर्वांचा अधिकार आहे .शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य ,समता आणि न्याय प्रस्थापित करण्यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे .जर असे झाले तर समाजात शिक्षकांबद्दल आदर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही .
पुर्वीच्या काळी शिसकांना समाजात सर्वोच्च मानाचे स्थान असायचे कारण त्या काळात शिक्षक हा माहीतीचा स्त्रोत होता . आता मोबाईल व इंटरनेट मुळे विद्यार्थ्याकडे शिशकांपेक्षा जास्त माहीती असते . शिक्षकांनी सुद्धा माहीती तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करून अद्यावत झाले पाहिजे व आपल्या आचरणाद्वारे आपले सामाजिक स्थान अबाधित ठेवले पाहीजे असे मत त्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . मीनाक्षी वायकोळे ह्या होत्या . यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ .सत्यजित साळवे यांचे आभार मानून सत्यजित साळवे यांनी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत च्या शिक्षण पद्धतीची मांडणी केली यातून नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडली असे मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय स्टाफ अकॅडमी चे ‘चेअरमन प्रा .एकनाथ नेहेते यांनी करून दिला .तर आभार प्रदर्शन प्रा .आशिष नवघरे यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा . हर्षल पाटील , प्रा . कु प्रणाली भोगे व स्टॉफअकॅडमीच्या सदस्यांनी सहकार्य केले .
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ . सुनील पाटील ,डॉ . बी एच बऱ्हाटे प्रा . डॉ . ए डी गोस्वामी प्रा .एन ई भंगाळे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते .