जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍याचा मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न –

मुंबई : मंत्रालयाच्या पक्षहसरात जळगाव जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सुनील गुजर असे या शेतकर्‍याचे नाव असल्याची माहिती आहे. मका व सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत असल्याचं या शेतकर्‍यांचं म्हणणं आहे आणि यातूनच या शेतकर्‍याने आज मंत्रालय परीरसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली व सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर या शेतकर्‍याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं व अनर्थ टळला. सध्या त्या शेतकर्‍यास मरीन ड्राईव्ह या पोलीस स्टेशनला नेण्यात आलं असून, चौकशी सुरू आहे.