भुसावळ –
खंडाळा येथील मुख्यमंत्री पेयजल योजना सुद्धा आता चौकशीच्या फेऱ्यात सापडली असून या योजनेचीही चौकशी करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हा सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य प्रेमचं सुरवाडे यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
खंडाळा या गावात 20 ते 15 ते 16, 2021 मध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली होती व त्यात नऊ प्रकारची कामे मंजूर होती त्यात सर्वे, उद्भभव (बोअर), पंप हाऊस, मशीनरी, रायझिंग मेन, जलकुंभ, वितरण व्यवस्था, ताराचे कंपाऊंड, ट्रायल, असे असून या कामाची एकूण किंमत 42.58.133/- रु.अशी आहे त्यापैकी कामाचा सर्वे करण्याची गरजच नाही कारण उद्धभव हा गावापासून अर्धा किलोमीटर सुद्धा नाही व उद्भभव विहीर तर वाटत नाही की विहीर 22लाख रुपयात गेली असेल व ती पाटबंधारे विभागाच्या बुडीत क्षेत्रात आहे तसेच रायझिंग मेन हेसुद्धा उद्भभव पासून गावाच्या जुन्या या विहिरीपर्यंत बुडीत क्षेत्रात आहे तसेच रायझिंग मेन हे सुद्धा उदभव पासून गावाच्या जुन्या विहिरी पर्यंत आणली व तेथून जुन्या रायझिंग मॅट ला जोडली गेलेली दिसते त्यामुळे तीसुद्धा 555020/- रुपयात केली असेल असे वाटत नाही त्यानंतर गावातील वितरण व्यवस्थाही सर्व गावात असताना मक्तेदाराने फक्त ठीक ठिकाणी तुकड्यांच्या स्वरूपात तीस ते 35 ठिकाणी तुकडे करून टाकलेली आहे व त्यात सुद्धा एकच ठिकाणी डबल डबल नावे आढळतात त्यापैकी गावातील दलित वस्ती मध्ये यांनी वितरण व्यवस्था केलीच नाही म्हणजे दलितांना दूषित पाण्यापासून बाधा झाली तर यांना त्यांचे देणेघेणे नाही दलित वस्ती ला संबंधित शाखा अभियंता व मक्तेदार यांनी वाऱ्यावर सोडले आहे. ही व्यवस्था सुद्धा अंदाज पत्रकातील किमती एवढी वाटत नाही की 6,60,000/- मध्ये यांनी केली असेल असे वाटत नाही कारण गावात अखंड स्वरूपात न टाकता तुकडे तुकडे करण्यात आले तसेच वायर फिक्सिंग ही ताराची असल्यामुळे तीसुद्धा 1,17,000 जाऊ शकत नाही कारण तेथे पूर्वी लोखंडी अँगल सहित तार फिक्सिंग होती व आताची फिक्सिंग त्याच अँगल वर करण्यात आलेले आहे तसेच ट्रायलरन (वितरण व्यवस्था) ही करण्याची गरज नाही कारण यांनी वितरण व्यवस्था अखंड स्वरुवात टाकलेली नाही त्यामुळे याची ची गरज नाही आणि उद्भभव (बोर) पाटबंधारे तलावात हद्दीत आहे म्हणून यांनी हे सुद्धा 53,000/- रुपये काढले की काय अशी शंका निर्माण होत आहे म्हणून या योजनेची त्वरित चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे



