भुसावळ –

वीज कंपन्या अधिकाऱ्याननी वीज कंपनीला खाजगी मालमत्ता समजू नये कामगारांच्या न्यायासाठी व हक्कासाठी 22 रोजी पासून दिपनगर येथे आंदोलन व उपोषण करणार अशी माहिती राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसचे जनरल सेक्रेट्री अरुण दामोदर यांनी दिली भुसावळ येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कामगार उपस्थित होते.
कलम ३५३ सरकारने लागु केल्यापासुन काही सार्वजनिक आस्थापनेतील अधिकाऱ्यांत कमालीचे बळ आल्याची प्रचिती अनेकदा सामाजिक तथा संबंधीत क्षेत्रात कार्यारत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आलेली आहे . यापुर्वी रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी ,कार्यकर्ते सक्रिय असायचे अकर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे असंतोष निर्माण झाल्याची वस्तुस्थिती होती , त्यामुळेच सरकारने सदर कायदा लागु केला . परंतु या कायद्याच्या अंमलबजावणीनंतरही प्रश्न सुटत नाहीत , सोडविल्या का जात नाहीत आणि ते सोडवावे यासाठी संबंधीत अधिकाऱ्यावर बंधन असावे म्हणून कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याने आता या कायद्याचा काही अधिकारी दुरपयोग करीत असतांना निर्देशनात येत आहे . वास्तविक सदर कायदा आल्याने अधिकाऱ्यांना स्वतंत्रकाम करण्याची ताकद मिळाली असे असले तरी ते त्यांच्या कर्तव्यापासुन अलिप्त राहु शकत नाहीतकोरोना व अत्यावश्यक कायद्याच्या नावाखाली अनेक व्यवस्थापकांनी कर्मचारी विशेषता कंत्राटी कामगार यांचे प्रलंबीत प्रश्न वारंवार पत्र व्यवहार करुनही निकाली काढले जात नाहीत . त्यामुळे अधिकाऱ्यांत अधिकारशाही बळवल्याचे व त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्या महानिर्मिती कंपनीतील काही अधिकारी दुजाभावची वागणुक देतआहे. यामुळे अधिकारशाही बळगवण्याची शक्यता जास्त आहे. दिपनगर येथील मुख्य अभियंता नव्याने येथे रुजू झाले असुन इतर ठिकाणी चांगले काम केले म्हणून बक्षीस म्हणून दिपनगर विज केंद्रात बदली केली आहे . ते आल्याने तेथील कामगार वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . विशेषता त्यांच्या वर्तुणुकीमुळे कामागारांचे प्रश्न सोडवावेत म्हणून कर्मचारी यांच्या कॅबीनमध्ये जाण्यास घाबरत आहेत . यावरुन त्यांच्या हुकुमशाही व्यवस्थापनाची प्रचिती अनेकांसाठी आहे. अशा आरोप असा आरोप अरुण दामोदर व कामगारांनी केला आहे.
मुख्य अभियंताना भेटणे म्हणजे चक्रव्हुवात जाणे –
अधिकाऱ्यांन कडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेवून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये चक्रव्हुवातुन जावे लागते . प्रवेश दारावरच येणाऱ्यांची तपासणी करुन घेण्यात येत आहे . ऐवढे झाल्यावरही कॅबेनमध्ये गेल्यावर पदाधिकाऱ्यांसोबत कोणता व्यवहार होईल याची स्वाश्वती नसल्याने अनेक कामगार कॅबीनपासुन दुर राहत आहेत . काही विज अधिकारी महानिर्मिती कंपनी स्वतःची खाजगी कंपनी असल्याची त्यांची वर्तवणुक असल्यानेच यासर्व प्रकारामुळे मुख्य अभियंता यांना स्वतःवर हल्ला होण्याची भिती वाटत आहे . म्हणून त्यांच्या संरक्षणा स्वतंत्र गुंडाची नेमणुक करावी अशी मागणी करण्याची वेळ आली आहे . यासर्व विचित्र वागण्यामुळे कामगारांचे विशेषता कंत्राटी कामगारांचे जिवण मरणाचे प्रश्न प्रलंबीत राहिल्याने व चुकीच्या व्यवस्थापनामुळे अनेक कंत्राटी कामगारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
महानिर्मितीचे आर्थिक नुकसान –
विजेची मागणी कमी व इतर बाबी सांगुन सुरळीत विज केंद्र बंद ठेवण्याचे प्रकार सातत्याने सुरु असल्याने महानिर्मितीचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे . यामुळे सदर कंपनी भविष्यात आर्थिक दिवाळखोरीत येण्याची शक्यता असल्याने विज केंद्रातील अवाजवी काम बंद करावे अशी मागणी वारंवार केलेली असतांनाही येथील काही बेबंद झालेले व कोणाचाही दबाव नसल्याने काही अधिकारी सातत्याने राजकीयांच्या दबावाखाली गरज नसतांना ठेके काढून कंपनीचे आर्थिक नुकसान करीत असल्याचे निदर्शनात आणुन दिल्यावरही कारवाई होत नसल्याने सर्वत्र नाराजी आहे.
दिपनगर येथे 22 जून पासुन आंदोलन
कंत्राटी कामगारांचे प्रश्न , प्रकल्पग्रस्तांना न्याय , कंत्राटी महिलावर अन्याय , व भष्टाचाराचा मुद्दा इत्यादी प्रश्नावर सदर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच मुख्य अभियंता यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे इत्यादी प्रश्नांचा बाबतीत २६ जुन २०२१ पासुन दिपनगर कार्यलयासमोर उपोषण करणार असुन त्यानंतरही प्रश्न मार्गी न दिल्यास घेराव करण्यात येईल असेही कामगारांनी सांगितले.


