जळगाव –

ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात असोदा गावातील रहिवासी असलेल्या आईसह मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता हा अपघात झाला.
असोदा येथील रहिवाशी दिलीप अभिमन कोळी आणि त्यांची आई अलकाबाई अभिमन कोळी हे दुचाकी (एम.एच.19 डी.सी.6687) ने 12 जून रोजी जळगावला दुचाकीने कामानिमित्त आले व काम झाल्यानंतर परतीच्या प्रवासात असताना ममूराबाद रस्त्याच्या दरम्यान असलेल्या अरुणामाई फार्मसी कॉलेजजवळ भरधाव ट्रक (एम.एच.19 सी.वाय.5473) ने जोरदार धडक दिली. यात दोघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र औषधोपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईक विनोद कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


