हटीया-पुणे व मालदा टाउन-सुरत गाडी ७ फेब्रुवारी पासून धावणार


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रवाश्यांच्या सोयीसाठी हटीया-पुणे आणि मालदा टाउन -सुरत दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
हटीया-पुणे विशेष गाडी
डाऊन 02850 पुणे-हटीया विशेष गाडी 7 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर बुधवार, रविवारी पुणे येथून 10.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी हटीया स्टेशनला 4.25 वाजता पोहचेल. या गाडीला मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चांपा, झारसुगुडा, राउरकेला स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02849 हटीया-पुणे विशेष गाडी 05 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी व शुक्रवारी हटीयाहुन 8.05 वाजता रवाना होईल झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी पुणे स्टेशनला 2.45 वाजता पोहचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
मालदा टाउन-सुरत विशेष गाडी
अप 03425 मालदाटाउन-सुरत विशेष गाडी 6 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी मालदा टाउनहुन 12.30 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी सुरतला 4.00 वाजता पोहचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 03426 सुरत-मालदा टाउन विशेष गाडी 8 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी सुरतहुन 2.20 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी मालदा टाउनला 6.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, रांची, मुरी, बोकारो स्टिल सिटी, चंद्रपूरा, धनबाद, आसनसोल, दुर्गापूर, सिवरी, रामपूर हट, पकौर, न्यू फरक्का स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *