कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी केली ईदच्या दिवशी दुवा ; घरातच केले नमाज पठन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहर व परिसरामध्ये यंदा अत्यंत साध्या पद्धतीने घरातच ईद साजरी करण्यात आली. कोरोना संकट दूर व्हावे, देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन पूर्ववत व्हावे यासाठी ईद-उल-फित्रला घराघरात दुवा करण्यात आली. तसेच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ईदमध्ये गळाभेट व हस्तांदोलन टाळून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कोरोनामुळे लॉक डाऊन परिस्थितीत देशासमोर मोठे संकट आले आहे. या स्थितीत देशाची आर्थिक स्थिती डबघाईला जात आहे. सर्वसामान्यांची उपजीविका चालवणे अवघड बनले आहे. याकरिता मुस्लिम समाज बांधवांनी नवीन कपडे न परिधान करता गोरगरिबांची जास्तीत जास्त मदत करण्याकडे भर दिला. यंदा ईदची सामूहिक नमाज पठण न झाल्यामुळे साहजिकच गळाभेट वस्तू हस्तांदोलनही समाज बांधवांनी टाळले.देशावर मोठे कोरोनाचे संकट आले असताना हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असताना तसेच महामारीच्या या काळात अनेक बांधव महामारीचा सामना करत असताना ‘हालत हमे इजाजत नही देते की, हम ईदकी खुशियाँ मनायें’, असे म्हणून अनेक जण भावविवश झालेले अनेक ठिकाणी दिसून आले .
‘ईद’ हा आनंद साजरा करण्याचा पर्व असतो. मात्र यंदा ईद अत्यंत साध्या पद्धतीने घरातच राहून साजरी करण्यात आली. जेष्ठांच्या मते आयुष्यात कधीही ईदची नमाज घरी पठण केली नाही. मात्र यंदा उद्भवलेली परिस्थिती वेगळी आहे. सन २०२० च्या ईदची इतिहासात नक्कीच नोंद होईल .
हिंदू बांधवांनी सोशल मीडियावर दिल्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देवून जातीय सलोख्याचे दर्शन घडविले.
ईद नमाज पठण झाल्यानंतर हिंदू समाज बांधव मुस्लीम समाज बांधवांच्या घरी येऊन ईदच्या शुभेच्छा देतात व मुस्लीम बांधवही त्यांना शिरखुर्माचा आस्वाद घेतल्या शिवाय जाऊ देत नाही. नेहमीच ईदला जातीय सलोखा दिसून येतो. यंदा परिस्थिती वेगळी असल्यामुळे हिंदू समाज बांधवांनी सोशल मीडिया, भ्रमणध्वनीद्वारे मुस्लीम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर यंदा ईदला बच्चे कंपनीचा चांगला हिरमोड झाला. ईदला भेटण्यासाठी येणारे प्रत्येक आप्तेष्ट बच्चे कंपनीला ईद्दी (भेट) देतात. यंदा मात्र घरच्या घरीच ईद साजरी झाल्यामुळे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. फक्त फोनवर शुभेच्छा देण्यात आल्या. यामुळे बच्चे कंपनींना ईद्दी मिळाली नसल्याने बच्चे कंपनीचा चांगला हिरमोड झाला. तर महिलांमध्ये स्वादिष्ट रूचकर पदार्थ ,मिष्ठान्न, बनवून खातिरदारी करता न आल्याने तसेच नवनवीन दागीने आभुषणे , साजश्रृंगार , सुगंधि अत्तर, न मिळाल्याने उदासीनता दिसून आली .या महामारीचे संकट लवकर दूर होवो अश्या दुवा घराघरातुन मुस्लिम बांधवानी केल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *