भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातून 47 भाविक रेल्वे द्वारे तीन धाम यात्रेसाठी गेले होते. मात्र दिनांक 22 मार्च पासून रेल्वे बंद झाल्याने हे भाविक पुढील यात्रा रद्द करत खाजगी बस द्वारे भुसावळ कडे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्याने देशभरातील राज्य सीमां बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इलाहाबाद वरून भुसावळ कडे येत असताना या भाविकांची बस मध्यप्रदेश सीमेवर थांबविण्यात आली आहे.
गेले दोन दिवसापासून हे भाविक ज्या मध्यप्रदेश सीमेवर अडकून पडले आहे तो जंगली भाग असून जवळच असलेल्या एका छोट्या रेल्वे स्थानकावर एक रात्र या भाविकांनी काढली मात्र रेल्वे पोलिसांनी तिथून त्यांना हाकलून लावल्याने आता हे भाविक रस्त्यावर आले हे तसेच जवळील असलेल्या खाण्याच्या साहित्यावर भाविकांनी दोन दिवस काढले. मात्र आता हे साहित्य संपत आल्याने खाण्यापिण्याची सुद्धा चिंता या भाविकांना भेडसावु लागली आहे.जळगाव जिल्हयातील व महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधी यांनी आम्हा भाविकांची सुटका करून सुखरूप आणण्यास मदत करावी अशी याचना हे भाविक करत आहेत.



