भुसावळ (प्रतिनिधी )- येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतील महिलांनी हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली वाहून निंदणीय घटनेचा तिव्र निषेध करण्यात आला तसेच यातील नराधम आरोपीस त्वरित फाशी व्हावी अशी मागणी करण्यात आली असून याबाबत प्रांताधिकारी यांना सोमवार १७ रोजी निवेदन देण्यात आले .
या घटनेला अनेक दिवस उलटून गेले तरीही अद्याप न्याय नाही म्हणून हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला त्वरित भर चौकात फाशीची शिक्षा व्हावी जेणें करून पीडितेस खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी मागणी महिलानी केली असून दुदैवी अंत झालेल्या पीडितेला श्रद्धांजली वाहुन पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी अशी ही बाब असून या काळ्या दिवसाचा याचा तिव्र निषेध केला .
हे प्रकरण फ़ास्ट कोर्टात जलदगतीने चालवून नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, मागणी केली असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील, तर न्यायव्यवस्थेने अशा खटल्यांचा जलद
न्यायनिवाडा करून नराधमांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून
भविष्यात असे कृत्य करायची कुणाची हिंमत होणार नाही,पीडितेच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देवून न्याय द्यावा,अशीही मागणी केली आहे .
यावेळी सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, भाग्यश्री नेवे, उज्वला बागुल, राधिका वाणी, पुजा नेवे, अनुराधा टाक, अंजली नेवे, आराधना टाक, प्रतिभा विसपुते, अॕड. कल्पना टेमाणी, निलिमा चौधरी, यांचेसह संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या .



