ग्रामीण भागातील विकासाकरीता संघटन व जनजागृती आवश्यक – चैत्राम पवार देवगिरी कल्याण आश्रम प्रांत महिला कार्यकर्ता अभ्यासवर्ग भुसावळ येथे संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )-
ग्रामीण भागातील विकासाकरीता संघटन, जनजागृती व शहरी नागरिकांचा सहभाग अतिशय महत्वपूर्ण असून विकासाकरीता शासनाच्या योजनां बरोबर जनजागृतीची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या समारोपासाठी आलेले देवगिरी कल्याण आश्रमचे अध्यक्ष चैत्राम पवार यांनी केले . यावेळी व्यासपीठावर डॉ निलेश भीरुड, शुभांगी नेने , उपस्थित होते . चैतराम समारोपीय भाषणात बारीपाडा या गावाचा विकास कसा झाला, आणि महिला यात कश्या सक्रिय आहे,महिलांचे माध्यमातूनच पुढील पिढीस ज्ञानसंवर्धन होईल.समाजातील सर्व घटकांचा सर्वांगी विकास करन्याकरीता सतत प्रयत्नशील असले पाहिजे . शहरवासी, ग्रामवासी,व वनवासी हे एक आहे . शहरातील लोकांनी ग्रामीण भागातील विकास, उद्योग व्यवसाय वाढवन्या करीता संपर्क केला पाहिजे. जंगल,जल व शेती हे धन आहे . शाश्वत विकासाच्या मागे धावत आपण परंपरागत पारंपरिक संपत्ती नष्ट करीत असल्याची खंत तसेच डोंगरदेव पूजापद्धती (आदिवासी पूजा पद्धती ) ही सुद्धा हिन्दू परंपरागत पूजा पद्धती आहे , मात्र शहरातील लोक यात सहभागी होत नसल्याचेही मत चैत्राम पवार यांनी मांडले.तसेच समान सहभाग योजना पोहचलीच पाहिजे याकरीता महिलानी व शहरीभागातील नागरिकांनी संघटित होऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे असे आवाहन केले .तसेच संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कार्य व त्या विषयी भाष्य केले.
दरम्यान येथिल अतिथी भवन येथे तिन दिवयीय महिला कार्यकर्ता
अभ्यास वर्ग दि.7 फेब्रुवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित
करण्यात आले होते. या अभ्यास वर्गाचे उदघाटन 7 फेब्रुवारी रोजी बाबासाहेब देशपांडे (पश्चिम प्रांत संघटक) व डॉ. किशोर मोरे (प्रांत उपाध्यक्ष देवगिरी कल्याण आश्रम) यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून तथा भारतमाता, भगवान बिरसामुंडा, बाळासाहेब यांचे प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. या तिन दिवसांच्या अभ्यास वर्गात एकुण 13 सत्र झाले या सत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वक्त्यांचे मार्गदर्शन लाभले. जनजाती समाजावर होणारे आक्रमण व परिणाम या विषयावर बाबा देशपांडे यांनी
मार्गदर्शन केले. सौ. अनघा कुलकर्णी यांनी राणी दुर्गावती व राणी मॉ
गाईदिन्ल्यु यांचे चरित्रावर कथन केले. तर वनवासी कल्याण आश्रमाचा
परिचय डॉ. किशोर मोरे यांनी करून दिला. हितरक्षा हा विषय
गणेश गावित यांनी मांडला तसेच सोशल मिडीयाचा समाजावर प्रभाव
व परिणाम यावर अड. वैशाली चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यकुशलता व कार्यकर्ता व्यवहार हा विषय डॉ. मंदार म्हसकर
यांनी अतिशय सुंदर रित्या मांडला. जनजाती समाज हिन्दूसमाजाचे
अभिन्न अंग या विषयावर शुभांगी नेने यांनी मागर्दशन केले. विवीध
आयामात महिला कार्यकर्त्यांचा सहभाग व नगरीय कार्य यावर
मोहिनी नाईक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. मेधा जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन
अड. जास्वंदी भंडारी यांनी केले. कार्यक्रमाला प्रांतातील 40 महिला
कार्यकर्ता उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर मोरे
डॉ. निलेश भिरूड श, मधुकर वाणी अड. चित्र आचार्य, काशिराम
बारेला, अड. निलेश भंडारी, अड. जयश्री देशमुख, अड. वैशाली
चौधरी, अड. जास्वंदी भंडारी व विरसिंग वसावे यांनी मेहनत
घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *