मध्य रेल्वेची ४.४२ लाख वॅगनच्या माध्यमातून २३.२२५ दशलक्ष टन मालवाहतूक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या १.६७ लाख भारित वॅगन्सची वाहतूक
उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मालाची वाहतूक वेळेवर करण्यासाठी, रेल्वेने कोविड-१९
कारणाने लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत.
२३ मार्च २०२० ते ९ सप्टेंबर २०२० या काळात मध्य रेल्वेने २३.२२५ दशलक्ष टन
मालवाहतुकीची यशस्वी पूर्तता केली.
मध्य रेल्वेने दि. २३ मार्च २०२० ते ९ सप्टेंबर २०२० पर्यंत ९,२७९ मालगाड्या चालविल्या. त्यातून
४,४२,९४४ वॅगन्स भरून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व पोलाद, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची माल वाहतूक करण्यात आली आहे. या
कालावधीत दररोज सरासरी २,५९० वॅगन्सची मालवाहतूक केली गेली.
मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या १,६७,०२३ वॅगन्स
विविध वीज प्रकल्पांपर्यंत नेल्या. तसेच अन्नधान्य आणि साखर ५,१५५ वॅगन्स;
शेतकर्‍यांच्या हितासाठी २०,५४३ खतांची वॅगन्स व ६,५५५ कांद्याचे वॅगन्स; पेट्रोलियम
पदार्थांचे ४३,८२४ वॅगन्स; लोह आणि स्टीलच्या ११,७४७ वॅगन्स; सिमेंटची २८,२९९ वॅगन्स;
१,३७,७६० कंटेनर वॅगन्स आणि सुमारे २२,०३८ डी-ऑईल केक आणि संकीर्ण वस्तूंचे वॅगन्स
वाहून नेले.
मध्य रेल्वेवर क्षेत्रीय स्तरावर आणि विभागीय स्तरावर बहु-अनुशासित व्यवसाय विकास
युनिट (बीडीयू) ची स्थापना रेल्वेने केली आहे. वरीष्ठ अधिका-यांचा समावेश असलेला हा घटक रेल्वेमार्फत अधिक वाहतूक संधी निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार
संवाद साधतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *