भुसावळ शहर व तालुका मराठा समाज मंडळातर्फे आरक्षण स्थगितीच्या निषेधपर निवेदन सादर,


भुसावळ (प्रतिनिधी) –
विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो मराठा आरक्षणाला स्‍थगिती देण्‍यास जबाबदार व दगा फटका करणार्‍यांना त्‍याची जबर किंमत मोजावी लागेल असा ईशारा मराठा समाज भुसावळ तर्फे प्रांतांना दिलेल्‍या निवेदनादवारे देण्‍यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस न्‍यायालयाने स्थगिती दिली आहे.
मराठा समाज राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे.अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली. हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले.आपल्‍या देशाच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण व संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग मराठा समाजाने केला आहे .अशा राष्ट्रभक्त समाजाला डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळणे गरजेचे आहे.
यावेळी मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष किरण सिताराम पाटील, कार्याध्यक्ष ईश्वर पवार, छावा तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे, छावा युवा तालुकाध्यक्ष बापू पाटील,रुपेश पाटील, विजय कलापुरे आदी उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *