राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत नाशिकचे कवी रत्नदीप जाधव प्रथम

मुंबई अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या अक्षरमंच राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत नाशिकचे कवीवर्य:-रत्नदीप जाधव (राजरत्न) यांच्या कला संगीत कवितेने प्रथम क्रमांक पटकावून, साहित्य काव्य क्षेत्रात नाशिकची शान राखली.

मुंबई अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या अक्षरमंच कविता लेखन राज्यस्तरीय स्पर्धा क्रमांक २ चा अंतिम निकाल नुकताच जाहिर झाला.मुंबई अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईच्यावतीने ,हया आँनलाईन राज्यस्तरीय स्पर्धा विनामूल्य घेण्यात आल्या होत्या.पुरुष गटातील ७७ कवी आणि महिला गटातील ११४ कवींनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. दोन्ही गटातील एकूण १९१ कवी आणि कवयित्रींनी उत्साहाने काव्यस्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी १) गुरु महिमा. २) पर्यावरण / निसर्ग ३)कला आणि संगीत हे विषय काव्य लिखाणासाठी देण्यात आले होते. मोहोद्दीन नदाफ – सोलापूर, राजेश्वर खेडेकर – बुलढाणा आणि ज्ञानेश्वर राठोड – पालघर यांनी गुरु महिमांच्या थीमवरील काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. प्रा.नागेश हुलवाले – नवी मुंबई यांनी पर्यावरण निसर्ग या विषयावर प्रथम क्रमांक मिळवला, तर नाशिकचे कवी रत्नदीप जाधव(राजरत्न) यांनी  “कला संगीत”विषयावरील काव्य लेखन स्पर्धेत नाशिक जिल्हयातुन प्रथम क्रमांक पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *