भुसावळ (प्रतिनिधी )-
भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षात गलवान खोर्यात झालेल्या चकमकीनंतर भारताचे २० जवान शहिद झाले होते.
या शहिद जवानांना भुसावळ विधानसभा युवा काँग्रेस तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली .
अध्यक्ष इमरान खान, इद्रीस खान यांचे सह उपस्थित मित्र परिवाराने मेणबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली वाहिली. यावेळी अमीर खान इद्रीस खान, शेख मुस्ताक अहमद, शेख सिराज, कलीम भाई, तन्वीर खान, शेख शोएब, इरफान मणियार, साबीर शॉह, शेख कासीम आदी उपस्थित होते.



