जळगाव -
सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिले प्रवचन जिथं दिले त्या ऐतिहासिक सारनाथ येथे सम्राट अशोक यांनी ई. स. पूर्व २४९ मध्ये लाल विटा आणि दगडांचा ४३.६ मीटर उंच , २८ मीटर व्यास असलेला दंडगोलाकार भक्कम असा स्तूप उभारला .
भारतातून बौद्ध धर्म लोप पावला व या ऐतिहासिक वास्तुकड दुर्लक्ष झाले . काही राजांनी त्यास उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. १२ व्या शतकात कनौज च्या कुमारदेवी राणीने काही प्रमाणात पुनर्बांधणी केली. पुनः काही वर्षांनी त्याकडं दुर्लक्ष झाले . सन १७९४ मध्ये वाराणसीचा दिवाण असलेल्या जगतसिंग याने या स्तूपाच्या काही विटा घर बांधकामा करिता वापरल्या . १८३५ मध्ये सर अलेक्झांडर कनिंग हॅम यांनी या स्थळाचे उत्खनन करून काही प्रमाणात विकास केला . १९०४ मध्ये उत्खनन पूर्ण झाले .
सध्या सारनाथ येथे या स्तुपासोबत , अशोक स्तंभ , मलगंधकुटी विहार असून तिथं भगवान बुध्द यांची धर्मचक्र मुद्रेतील संगमरवरी दगडाची अत्यंत भव्य व आकर्षक अशी मूर्ती आहे . भिंतीवर जपानी चित्रकार कोसेतू नोसू यांनी जातक कथेतील काढलेली चित्रं आहेत .
या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करावे या करिता भारत सरकार तर्फे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये युनेस्कोकडं प्रस्ताव सादर केला .
दक्षिण कोरिया येथील बुसान शहरी सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या ४८ व्या अधिवेशनात दिनांक २५ जुलै २०२६ रोजी युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत उत्तर प्रदेशातील सारनाथ येथील ' धम्मेक स्तुपास ' जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली . युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळविणारे सारनाथ हे ४५ वे वारसा स्थळ ठरले . ही बाब भारत देशाकरिता अत्यंत अभिमानास्पद आहे . भारत सरकार , युनेस्को आदींचे शतशः धन्यवाद.
जयसिंग वाघ , जळगाव
९८८१९२८८८१