३५ कादंबऱ्या , १५ कथा संग्रह , १२ चित्रपट संवाद , १० पोवाडे , १ नाटक , १ प्रवास वर्णन लिहिणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त प्रासंगिक लेखन.
जळगाव (प्रतिनिधी) - अण्णा भाऊंचे अनेक साहित्य २५ पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे .
भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ २००२ मध्ये ४ रुपयाचे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले .
२०२२ मध्ये मॉस्को ( रशिया ) येथील ऑल रशिया स्टेट लायब्ररी मध्ये त्यांचा पुतळा रशिया सरकारने बसविला .
२७ नोव्हेंबर २०२२ ला त्यांना छ. संभाजी नगर येथील महात्मा गांधी मेमोरियल युनिव्हर्सिटी तर्फे मरणोत्तर डिलीट पदवी प्रदान केली.
त्यांनी कामगारांचे अनेक लढे लढले आहेत . संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतिशय तन्मयतेने काम केले आहे .
मार्क्सवादाने प्रभावित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्याकामी खर्ची घातले .
त्यांचा ' स्टालिनग्राडचा पोवाडा ' तुफान गाजला या पोवाड्याने त्यांना रशियात तुफान लोकप्रियता मिळाली .
त्यांनी दलीत , आदिवासी , भटके या लोकांचे जीवन आपल्या साहित्यातून मांडले .
१९४२ च्या ' चले जाव ' आंदोलनात सक्रिय भाग घेतला व एकाच कार्यक्रमात २ लाख पेक्षा अधिक रक्कम गोळा करून कम्युनिस्ट पार्टीला पार्टी फंड म्हणून मिळवून दिला .
संपूर्ण जीवन चळवळीला समर्पित करणारे , प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर पोहाचणारे , लोकशाहीरीच्या माध्यमांतून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे , दिल्लीत जाऊन आपल्या शहीरीने केंद्र सरकारला घाम फोडणारे अण्णा भाऊ साठे मात्र त्यांच्या उत्तरायुष्यात अत्यंत हलाखीचे जिणे जगतात . जेवणाला , औषधाला सुद्धा पैसे नसणाऱ्या अण्णा भाउंना कित्येक दिवस अन्ना वाचून काठावे लागले .
त्यांचा आज स्मृतिदिन .
अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन.
जयसिंग वाघ
जळगाव
९८८१९२८८८१