भुसावळ (प्रतिनिधी ) - हतनूर प्रमुख सिंचन प्रकल्पातून मंगळवारी (8 जुलै) रात्री 8.00 वाजेपर्यंत 12,713 क्युसेक (360 क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाचे 6 रेडियल दरवाजे प्रत्येकी 1.0 मीटरने उघडे ठेवण्यात आले असून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. सध्या धरणाची जलपातळी 211.510 मीटर इतकी असून पूर्ण जलसाठा पातळी 214.000 मीटर आहे. धरणात 257.50 दशलक्ष घनमीटर (66.37%) एकूण जलसाठा असून 124.50 दशलक्ष घनमीटर (48.82%) उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. कालव्यातून 8.50 क्युमेक्स (300 क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू असून आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. दरम्यान, हतनूर धरण परिसरात आज 23 मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान 107 मिमी इतके झाले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवर मागील 7 तासांत एकूण 195.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये देढतलाई येथे 75.6 मि.मी., एरडी येथे 71.8 मि.मी., बऱ्हाणपूर येथे 25.4 मि.मी., लोहारा येथे 12.6 मि.मी., टेक्सा येथे 6.0 मि.मी., अकोला येथे 3.0 मि.मी. आणि गोपालखेडा येथे 0.8 मि.मी. पाऊस झाला. चिखलदरा व लखपुरी येथील पर्जन्यमानाची नोंद उपलब्ध नव्हती. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.


