भुसावळ (प्रतिनिधी ) – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माजी भुसावळ नगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात महिलांच्या समस्या, आरोग्य आणि सामाजिक सन्मान या विषयांना विशेष प्राधान्य देत उपेक्षित व कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांसाठी आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी दिली.

माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांचे मार्गदर्शना खाली गटनेते व सन्माननीय नगरसेवक व पालिकेच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात शहरातील , संघर्षशील तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ३०० महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या जेष्ठ साहित्यिक सीमा भारंबे, जयश्री काळवीट, चारूलता भालेराव, पत्रकार उज्वला बागुल, ॲड. जास्वंदी भंडारी , शैलजा वाघुळदे. राजश्री देशमुख. जयश्री पुणतांबेकर यांच्यासह अनेक महिलांचा गौरव करण्यात आला. शहरात प्रथमच पालिकेने. महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहित केल्याने महिलांनी आनंद व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले .
दरम्यान आयोजित प्रश्नमंजुषा कार्यक्रमात विजेत्या महिलांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या खेळामधून अनेक महिलांनी बक्षीस मिळवले.
कार्यक्रमाला नाट्य अभिनेत्री मंजुषा भिडे, डॉ. श्रद्धा चांडक, ललिता चौधरी, सायली चौधरी, नगरसेविका पुष्पा चौधरी, नसीम बी शेख , आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी डॉ. श्रद्धा चांडक यांनी “आरोग्यावर बोलू काही” या विषयावर मार्गदर्शन करत महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांचे आरोग्य सुदृढ असेल तर कुटुंब आणि समाज दोन्ही सक्षम राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला “सांस्कृतिक वारसा बोधचिन्ह” हा उपक्रम. जागतिक मराठी भाषा सप्ताह आणि महिला दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. या अंतर्गत मराठी साहित्य, संस्कृती आणि समाजकार्याशी निगडित व्यक्तींच्या घरासमोर त्यांच्या नावाची मराठमोळी पाटी लावण्याचा अभिनव प्रकल्प सुरू करण्यात आला.
या उपक्रमाची सुरुवात महिला साहित्यिक सीमा भारंबे यांच्या घरासमोर त्यांच्या नावाची पाटी लावून करण्यात आली. या अभिनव संकल्पनेमुळे मराठी संस्कृती, भाषा आणि साहित्याचा सन्मान जपत समाजात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख जपली जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. तसेच राजेंद्र जावळे सर यांच्या चित्राला राष्ट्रीय पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम सूत्रसंचलन प्रा उत्तम सुरवाडे, सर व अनुप खोब्रागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी राजेंद्र फातले परवेज शेख वैभव पवार यांचेसह . राहुल बोरसे, शशिकला ठोंबरे, संगीता बाक्षे , प्रतिभा तायडे डॉ कीर्ती फलटणकर ,गायत्री बोरसे संकपाळ मॅडम, कविता ठाकूर सुलक्षणा काळे, रोहिणी पाटील, कविता कमोदे, शारदा तायडे, पल्लवी वाघोदे, वर्षा सोनवणे यांनी परिश्रम घेतले. अनूप खोब्रागडे, गणेश सोनवणे/चौधरी आणि नरेंद्र वायकोळे. यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले
महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे भुसावळ शहरात महिला सन्मान, आरोग्य जागरूकता आणि सांस्कृतिक जतन यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम शहरासाठी प्रेरणादायी ठरला.



