जळगाव (प्रतिनिधी ) : भारताचे संविधान जनतेला हिंदू , मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा धर्मात विभागत नाही तर सर्व धर्मा, जाती, पंथ, भाषा, प्रदेशाच्या जनतेला भारतीय म्हणून एक करते. आम्ही प्रथम भारतीय आहोत व अंतिमतः सुद्धा भारतीय आहोत. ही शिकवण आम्हाला देते हीच शिकवण आमची सर्वात मोठी ताकत आहे असे प्रतिपादन संविधान गौरव रॅलीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी रॅलीला संबोधित करताना केले .

जळगाव शहरातील जनतेतर्फे संविधान दिनानिमित्त रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पंडित नेहरू चौक, शास्त्री टॉवर, जुने बसस्थानक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत संविधान गौरव रॅली काढण्यात आली. सुरवातीस बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. रॅलीत डॉ. करीम सालार यांनी आपल्या भाषणात भारताचे संविधान लिहीत असताना घेतलेले एकूण परिश्रम सविस्तर मांडले.
मुक्ती हारून यांनी हिंदू – मुस्लिम यांच्या एकसंघतेतुंच देश प्रगती करू शकेल असे ठामपणे सांगितले. भारती रंधे यांनी संविधानाने महिलांना दिलेले अधिकार सविस्तर सांगितले. प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी देशाचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो असे सांगितले. आयाज अली यांनी देश व देशातील लोक हा संविधानाचा केंद्रबिंदू आहे असे सांगितले.
रॅली चे नेतृत्व मुकुंद सपकाळे , जयसिंग वाघ, प्रतिभा शिंदे , मिलिंद सोनवणे, विनोद देशमुख. ॲड. आनंद कोचुरे, प्रा. प्रितपाल पवार , प्रा. किसन हिरोळे , ॲड. आनंद सपकाळे यांनी केले . सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले . प्रास्ताविक चेतन नन्नवरे , भूमिका विषद रंजीता तायडे , स्वागत संजय सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन संध्या तायडे यांनी केले.
रॅलीसाठी यांनी घेतले परिश्रम
रॅली यशस्वीतेसाठी नीलू ताई इंगळे , पुष्पा साळवे , कविता सपकाळे , ज्योती भालेराव , सुनंदा वाघ , वर्षा कोचुरे , पुष्पा तळेले , निवेदिता ताठे , मंगला पाटील , संगीता मोरे , दीपमाला सुरवाडे , सीमा शेजवळ , प्रतिभा घोडेस्वार , बापू सोनवणे , जगदीश सपकाळे , अजय बिऱ्हाडे , आनंदा तायडे , बापूराव पानपाटील , सुभाष सपकाळे , ॲड. राजेश गोयर , भगवान बाविस्कर , दिलीप सपकाळे , महेंद्र केदार , खालिद बागवान , पितांबर अहिरे , विनोद अठाइंगे , रमेश सोनवणे , श्रीकांत बाविस्कर यांनी परिश्रम घेतले .


