भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळेतील परिसरात आवळा,लिम्ब,नारळ,आंबा पेरू,डाळींब,वड,पिंपळ जास्वंद,मोगरा,जांभुळ अशा विविध प्रकारची वृक्ष लावण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी घरी व त्यांच्या घरा परिसरातील भागात एक व्यक्ती एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला असून ते वृक्ष जगवण्याची जबाबदारी देखील घेतली.

शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी वृक्ष लावल्याने होणारे फायदे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की आपल्याला प्रदूषण कमी करायचे असेल तर जास्तीत जास्त झाडे लावा.व ती झाडे जगवा. झाडे ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत.त्यांच्यामुळे आपल्याला शुद्ध हवा, पाणी आणि अन्न मिळते.
झाडे नैसर्गिक आपत्तींपासून आपले संरक्षण करतात.
झाडे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत.
झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
फोटो ओळ —-भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वृक्षारोपण करताना प्रिन्सिपल निना कटलर सोबत विद्यार्थी.


