दिव्यांगांना चालताना पाहून सभागृह भारवलं !

जळगाव (प्रतिनिधी ) – रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने लायन्स क्लब मुंबई भगवान महावीर विकलांग केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव शहरात दिव्यांग बांधवांसाठी तीन दिवसाच स्वयंसिद्ध शिबिराचा आयोजन सरदार वल्लभभाई पटेल सभागृह जळगाव येथे करण्यात आल असून आज पहिल्या दिवशी या शिबिरामध्ये जळगाव धुळे संभाजीनगर बुलढाणा अकोला वर्धा येथील 180 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेऊन जयपूर फूट कॅलिपर साठी
माप घेण्यात आली. यातील दहा दिव्यांग बांधवांना जयपूर फूट व कॅलिपर देऊन सर्व मान्यवरांच्या आणि उपस्थिताच्या साक्षीनं चालवण्यात आलं
या उपक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आमदार श्री राजू मामा भोळे यांच्या हस्ते लॉयन्स क्लब मुंबई चे चेअरमन श्री मोतीलाल पूनमिया श्री नरेश शहा श्री दिलीप सुंदेशा श्री राजेंद्र चोप्रा मुंबईचे लायन्स गव्हर्नर श्री विरफ मिस्त्री श्री सुरेशजी पोखराजजी जैन श्री निखिल बाबुभाई पारिक श्री फिरोज कत्रक श्री पवन अग्रवाल श्री सुरेश शहा श्री. दिलीप परमार जळगाव येथील लायन्स गव्हर्नर श्री गिरीश सिसोदिया या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेड स्वस्तिक सोसायटीचे सहमहाव्यवस्थाक श्री अशोक शिंदे हे होते
यावेळी जिल्हाध्यक्ष एड.राजेश झाल्टे कार्याध्यक्ष श्री जे बी पाटील डॉक्टर धनंजय बेंद्रे श्री. ज्ञानदीप पाटील डॉक्टर प्रमोद आमोदकर श्री नरेश चौधरी महिला अध्यक्ष सौ मनीषा पाटील प्रकल्प चेअरमन श्री सत्यनारायणाची खटोड सचिव डॉ. गणेश पाटील प्रकल्प संचालक राहुल सूर्यवंशी श्री दिलीप गवळी श्री कैलास पाटील श्री शरद पांडे श्री शेखर पाटील श्री संजय काळे श्री नवनीत भाई पटेल श्री नितीन बापट श्री खडके
श्री विजय मदानी श्री यश पांडे, सौ मंजुषा अडावदकर,
सौ नूतन तासखेडकर, सौ नीता वानखेडकर, सौ आशा मौर्य ,किमया पाटील, सौ हर्षा वनरा, सौ हर्षाली तिवारी, श्रीमती ज्योती राणे, सौ प्रेमलता खटोड, सौ शिल्पा बयास, सौ नेहा जगताप यांच्या सह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर धनंजय बेंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सत्यनारायण खटोड यांनी केले. दिनांक 13 जून पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून अपंगांना स्वयं सिद्ध करण्यात येणार आहे 13 जून रोजी दुपारी सर्व दिव्यांगांनी जयपुर फूट व कॅलिपर घेण्यासाठी येऊन स्वयंसिद्ध होण्यासाठी हजर राहावे. असे आव्हान आयोजकांनी केले आहे. या मानवता वादी उपक्रमासाठी आनंदाश्रम जळगाव व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.