कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल- मे २०२० च्या प्रथम द्वितीय, तृतीय, वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात व शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी – युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
देशात व राज्यात कोरोना महामारीच्या संसर्गाने थैमान घातले असुन, शासनाने या महामरीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात २१ दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील व कवियत्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डाॅ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एप्रिल २०२० मधे होणाऱ्या परीक्षांचे नियोजनावर याचा परिणाम झालेला आहे.
तसेच कवियत्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यातील बर्‍याचशा क्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्राचार्य, प्राध्यापक वर्ग यांचा कानोसा घेतला असता, चार वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रथम, द्वितीय, व तृतीय वर्षाच्या परीक्षामधुन सुट देवून, थेट चतुर्थ वर्षास प्रवेश निश्चित करावा व सध्यास्थित चतुर्थ वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर पुढे ढकलून परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली असून तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा मधुन सुट देवून, थेट तृतीय वर्षास प्रवेश निश्चित करावा अशीही मागणी भुसावळ युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांनी उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांना केली आहे.
सुरज पाटील यांनी असे सांगितले की विद्यापीठावर आलेला नैसर्गिक संकटाचा ताण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत, मानसिकता आणि विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे पुढील वार्षिक शैक्षणिक नियोजन याचा विचार करावा, प्रत्येक विद्याशाखेतील शेवटच्या वर्षाची वेळापत्रकात बदल करून, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठीच्या परीक्षा रद्द करून सरसकट कॅरीआॅन दिल्यास विद्यार्थी, विद्यापीठ, महाविद्यालये व कर्मचारी यांच्यावरील कोरोनाच्या महामारीचा धसका व परीक्षांचा ताणतणाव कमी करण्यास मदत होईल, अशी मागणी निवेदनाद्वारे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत, कवियत्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यांना केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *