भुसावळ – भगवान महावीर यांचे संदेश संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

भगवान महावीर स्वामी 2550 निर्वाण कल्याणक महोत्सव निमित्त आयोजित निंबध स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा व जिल्हा समीतीतील सदस्यांचा सत्कार राजभवन मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!
जळगाव जिल्ह्यात तसेच राज्यभरात समन्वय साधून निबंध स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल व सर्व शाळेमध्ये या स्पर्धेचा जास्तीजास्त प्रचार प्रसार केल्याबद्दल भगवान महावीर स्वामी 2550 निर्वाण कल्याणक महोत्सव जळगांव जिल्हा समितीचे सदस्य चेतन जैन,संजय जैन,अजय ललवाणी व प्रकाश छाजेड यांचा मेडल देऊन सन्मान करण्यात आला ????
दि २.२.२५ रोजी दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी,महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री श्री. ना.मंगल प्रभातजी लोढा, आमदार चैनसुखजी संचेती,जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) . ललितजी गांधी, तसेच कार्यक्रम संयोजक श्री. हितेंद्रजी मोटा ,समितीचे समन्वयक संदिपदादा भंडारी यांच्या प्रमुख उपस्थित भगवान महावीर स्वामी 2550 निर्वाण कल्याणक महोत्सव निमित्त आयोजित निंबध स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील विविध मान्यवर,जिल्हाधिकारी ,राज्यातून उत्कृष्ट विद्यार्थी व त्यांचे पाल्य,शिक्षक,शाळेचे प्रमुख उपस्थित होते.
चेतन जैन यांचे मनोगत:
भगवान महावीर यांचे सत्य, अहिंसा, अनेकांत वाद ,जगा आणि जगू द्या चे संदेश घरोघरी पोहोचवण्याकरिता या निबंध स्पर्धा द्वारा एक प्रयत्न करण्याचा काम सांस्कृतिक मंत्रालय व भगवान महावीर निर्माण महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
राज्यस्तरीय समिती व मान्यवरांनी आमच्या कामाची दखल घेत, आम्हाला जे सन्मान दिले त्याबद्दल मी वरिष्ठ समितीतले सर्व पदाधिकारी तसेच आम्हाला योग्य वेळी प्रत्येक कार्यात सहकार्य देणारे शासकीय समिती सदस्य, जिल्हाधिकारी व विविध शिक्षणाधिकारी, व निबंध स्पर्धेत भाग घेणारे शाळा, तेथील शिक्षक गण व विद्यार्थी व समाज बांधव यांचा धन्यवाद व आभार व्यक्त करतो.
राज्यस्तरावर निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले असून,
लवकरच जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी त्यांचे पालक संबंधित शाळा आणि अधिकारी वर्ग यांचे लवकरच पुढील नियोजन करून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येईल.


