भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मकर संक्रांति निमित्त पतंग महोत्सव चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना पतंग देण्यात आल्या.प्रिन्सिपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना पतंगी उडवण्यासाठी दिल्या. विद्यार्थ्यांनी शाळेतील मैदानावर पतंग उडऊन पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला. यावेळी ज्यांनी ज्यांनी पतंगी कापल्या त्यांनी शाळे परिसरात जल्लोष केला. शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी मकर संक्रांति व पतंग महोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी शाळेच्या चीफ ओएस सविता सहजे,शाळेच्या व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर,एनेक मॅथ्यू ,स्मिता जाधव , राहूल नेमाडे ,विजय संकत,अर्जुन सणस आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संक्रांति निमित्त पतंग महोत्सवात पतंग उडवतांना प्रिन्सिपल निना कटलर व शिक्षक वर्ग विद्यार्थी.


